आलियासोबत नाही तर रणबीर कपूर `या` अभिनेत्रीसोबत झाला रोमँटिक, फोटो पाहून चाहते हैराण
बॉलिवूडचा हँडसम हंक रणबीर कपूर सध्या चर्चेत आहे.
मुंबई : बॉलिवूडचा हँडसम हंक रणबीर कपूर सध्या चर्चेत आहे. नुकताच रणबीरच्या 'शमशेरा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्याला चाहत्यांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटात वाणी कपूरसोबत रणबीर कपूर दिसणार आहे. अलीकडेच वाणीने रणबीरसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.
ताज्या फोटोंमध्ये रणबीर कपूरचा शर्टलेस डॅशिंग अवतार पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे, वाणी कपूरही ब्लॅक आउटफिटमध्ये धुमाकूळ घालताना दिसत आहे. अभिनेत्रीच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर वाणी काळ्या रंगाच्या ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये खूपच हॉट दिसत आहे. रणबीर आणि वाणीचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
'शमशेरा' चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटात रणबीर कपूर पहिल्यांदाच एका डाकूच्या भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच हा चित्रपट रणबीर कपूरसाठी खूप खास आहे. तुम्हाला सांगूया की 'संजू' रिलीज झाल्यानंतर चार वर्षांनी अभिनेता धमाकेदार कमबॅक करत आहे. याशिवाय रणबीर 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात पत्नी आलिया भट्टसोबत दिसणार आहे.
रणबीर कपूर आणि वाणी कपूर लवकरच शमशेरा या चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट 22 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात वाणी आणि रणबीरसोबत संजय दत्तही दिसणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.