मुंबई :  बिग बॉस 15 च्या फिनालेदरम्यान, शोचा होस्ट आणि दबंग अभिनेता सलमान खानने इशारा-इशाऱ्यात खुलासा केला की, तो सिंगल नाहीये. शहनाज गिलसोबत झालेल्या संवादात सलमान म्हणाला होता की, जेव्हा तो सिंगल होईल तेव्हा तो खूप आनंदी असेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाईजानने पुढे काहीही सांगितलं नाही किंवा त्याच्या लेडी लव्हबद्दल कोणताही इशारा दिला नाही. पण बिग बॉस संपताच सलमानचा एक फोटो समोर आला होता. जो तीन फोटोंचा कोलाज होता. या फोटोत भाईजान एका मुलीसोबत दिसत आहे. या फोटोत तो मिस्ट्री गर्लसोबत खूपच कम्फर्टेबल दिसत आहे.


फोटोतील मुलगी काही फार ओळखीचा चेहरा नाही, पण सलमान तिला चांगला ओळखतो, हे या फोटोवरूनच समजतं. फोटोमध्ये दिसत असणाऱ्या या मुलीचं नाव पायल विजय शेट्टी असं आहे. ही मुलगी सलमानसोबत सेल्फी घेताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये भाईजानने पायलच्या गळ्यात हात घातला असून तिसऱ्या फोटोमध्ये तो तिला किस करताना दिसत आहे. कोलाज शेअर करताना पायलने कॅप्शनमध्ये लिहिलं की, ''आयी ऐसी रात है जो बहुत खुशनसीब है चाहे जिसे दूर से दुनिया वो मेरे क़रीब है''. एवढ्या छान  मेजवानीसाठी खूप खूप धन्यवाद'.


आता फोटो पाहिल्यानंतर जर तुमच्या मनाचे घोडे धावू लागले असतील तर थांबा, कारण पायल कोण आहे हे आम्ही तुम्हाला सांगतो. वास्तविक, पायल ही नुकतीच बिग बॉस 15 मध्ये दिसलेला विशाल कोटीयनची गर्लफ्रेंड आहे. बिग बॉस संपल्यानंतर पायल आणि विशाल सलमानशी बोलले, ज्याचा फोटो दोघांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.



पायलच्या फोटोवर कमेंट करत विशालने लिहिलं आहे की, 'आता मला अजय देवगण व्हावं लागेल'. अजय देवगण आणि सलमानने हम दिल दे चुके सनममध्ये एकत्र काम केलं होतं आणि या चित्रपटात ऐश्वर्या राय देखील होती.