मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये स्टार किड्सच्या पदार्पणाची चर्चा आहे. बॉलिवूड कलाकारांच्या मुलांची बॉलिवूडमध्ये एन्ट्री होत असताना आता भोजपुरी सुपरस्टार रवि किशन यांची मुलगी रीवा किशन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 'सब कुशल मंगल' या चित्रपटातून रीवा किशन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रीवा किशनने तिच्या पहिल्या 'सब कुशल मंगल' चित्रपटाचे शूटींग सुरू केलं आहे. शनिवारी संध्याकाळी झारखंडची राजधानी रांचीमधून चित्रपटाची सुरूवात करण्यात आली. चित्रपटाच्या शूटींगच्या पहिल्याच दिवशी रवि किशन, त्यांची पत्नी प्रीति शुक्लादेखील उपस्थित होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


रवि किशन यांना अनेक वर्षांपूर्वी चित्रपटातून पहिला ब्रेक देणारे नितिन मनमोहन, 'सब कुशल मंगल' चित्रपटाच्या निर्मात्या आणि नितिन मनमोहन यांची मुलगी प्राची मनमोहन, पद्मिनी कोल्हापुरे, दिग्दर्शक करण कश्यप, 'सब कुशल मंगल' चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारा पद्मिनी कोल्हापुरे यांचा मुलगा प्रियांक शर्मा चित्रिकरणाच्या पहिल्याच दिवशी उपस्थित होते. वन अप एंटरटेनमेंट या बॅनरखाली चित्रपटाची निर्मीती केली जाणार आहे. चित्रपटाचं संपूर्ण चित्रिकरण झारखंडमध्ये केलं जाणार आहे.



चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी रवि किशन यांनी 'रीवाचे संपूर्ण बालपण माझा अभिनय बघत गेलं. ती जन्मजातच कलाकार आहे. त्यामुळे या क्षेत्रात रीवाचं भविष्य उज्जल आहे' असं रवि किशन यांनी यावेळी म्हटलंय. रीवाने याआधी नसीरुद्दीन शाह यांच्या प्ले ग्रुपसोबत एक वर्ष अभिनय केला आहे. रीवाने अमेरिकेतून 'अॅक्टिंग कॉर्प इंस्टीट्यूट'मधून दीड वर्ष अभिनयाचं प्रशिक्षणही घेतलं आहे.