मुंबई : जेष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री तापसी पन्नू स्टारर 'पिंक' सिनेमाचा तामिळ मध्ये रिमेक तयार करण्यात येणार आहे. सिनेमाचे नाव 'नेरकोंडा पारवाई' असे असणार आहे. सिनेमाच्या निर्मात्यांनी शिवरात्रीच्या मुहूर्तावर सिनेमाचे फर्स्ट लुक प्रदर्शित केले आहे. ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी स्वत:च्या ट्विटर अकाउंटवरुन सिनेमाचे फर्स्ट लुक जारी केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



एच. विनोद द्वारा दिग्दर्शित सिनेमात अभिनेत्री विद्या बालण सुद्धा झळकणार आहे. विद्या बालण व्यतिरिक्त सिनेमात महत राघवेंद्र, श्रद्धा श्रीनाथ, एंड्रिया तारियांग आणि अभिरामी वेंकटचलाम हे कलाकार झळकणार आहेत. 'पिंक' सिनेमाला बोनी कपूर यांनी निर्मीत केले असून 'नेरकोंडा पारवाई' तामिळ रिमेक सिनेमाला बोनी निर्मित करण्याची शक्यता आहे. 


बॉलिवूडमध्ये 'पिंक' सिनेमाने चाहत्यांच्या मनावर एक चांगली छाप पाडली होती. सिनेमात अमिताभ बच्चन एका वकीलाच्या भूमिकेत दिसले होते. तर तापसी स्वत:च्या मर्जीने जगणारी एक निर्भिड मुलीच्या भूमिकेत दिसली होती. 2016 मध्ये आलेल्या या सिनेमाने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले होते. 'पिंक' सिनेमाचा तामिळ रिमेक प्रेक्षकांचे मनोरंजन करणार का नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.