या लहानग्याचं गाणं ऐकलं का?
या मुलाने गायलेलं गाणं सध्या नेटकऱ्यांना मंत्रमुग्ध करत असून काहीजण त्याला ज्युनिअर आतिफ असंही म्हणत आहेत.
मुंबई : सलमान खानच्या ‘टायगर जिंदा है’ चित्रपटातील ‘दिल दिया गल्लाँ’ या गाण्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. पाकिस्तानमधल्या एका लहान मुलाने असाच एक प्रयत्न केला आणि त्याने गायलेलं गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान गाजतंय.
या मुलाने गायलेलं गाणं सध्या नेटकऱ्यांना मंत्रमुग्ध करत असून काहीजण त्याला ज्युनिअर आतिफ असंही म्हणत आहेत.
आतिफ अस्लमच्या आवाजातील हे गाणं तरुणाईच्या प्लेलिस्टमध्ये दाखल झालं. त्यानंतर या गाण्याचे बरेच व्हर्जनसुद्धा ऐकायला मिळाले. आता पाकिस्तानमधल्या एका लहान मुलाने हेच गाणं गाण्याचा प्रयत्न करत केला आहे.