SSR Case:भाजप खासदाराच्या पत्राला मोदींनी दिलं उत्तर
सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती.
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला जवळपास ४० दिवसांचा काळ लोटला आहे. तरी देखील त्यांच्या आत्महत्ये मागील ठोस कारण समोर आले नाही. त्याच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत ३७ पेक्षा जास्त जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहे. एवढचं नाही तर सुशांतची आत्महत्यानसून हत्या आहे, असं वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले जात आहे. त्यामुळे सुशांतच्या आत्महत्येबाबत चौकशी सोपवण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली होती.
याकरता सुब्रमण्यम स्वामी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र देखील लिहलं होतं. त्यांच्या पत्राची दखल मोदींनी घेतली आहे. 'आम्हाला तुमचं पत्र २० जुलै रोजी मिळालं.' असं उत्तर मोदींनी एका पत्राच्या माध्यमातून दिलं आहे. मोदींचं हे पत्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
एकंदर पाहता मोदींनी सुब्रमण्यम स्वामींच्या पत्राची दखल घेतल्यामुळे आता या प्रकरणाला गती प्राप्त होण्याचे संकेत मिळाले आहे. परिणामी सुशांतने आत्महत्या का केली असावी. त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली.. हे रहस्य आता लवकरच उलगडणार असं चित्र समोर येत आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरात गळाफास घेवून आत्महत्या केली. दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येनंतर दिग्दर्शक करण जोहर, अभिनेता सलमान खानवर सडकून टीका केली. त्याचप्रमाणे सोशल मीडियावरून त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील कमी झाली. याचा सर्वात मोठा फटका अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता वरूण धवनला बसला आहे.