PM Narendra Modi Birthday: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा 72 वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छा पाऊस पडतो आहे. देशासह परदेशातूनही नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातायत. पंतप्रधान मोदी यांचे मंत्रिमंडळातील सहकारी नितीन गडकरी, राजनाथ सिंह, स्मृती इराणी यांनी वाढदिवसानिमित्त नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. कू प्लॅटफॉर्मवर #hbdmodiji हा हॅशटॅग ट्रेंडींगमध्ये आला असून याचा वापर करत सर्वसामान्य नागरीकही त्यांना शुभेच्छा देत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय क्रिकेटसंघाचा माजी कर्णधार आणि आघाडीचा फलंदाज विराट कोहली याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना तुम्हाला आनंदी आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना केली आहे. 




अभिनेता अनुपम खेर यांनीही पंतप्रधान मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "तुम्हाला दीर्घ आणि निरोगी आयुष्य मिळो. तुम्ही घेतलेली शपथ पूर्ण करण्यासाठी तुम्ही उत्तम प्रयत्न करत आहात आणि यापुढेही करत राहाल", असं ते म्हणाले. 




पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध राज्यात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान आज मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबियातून आणलेले 8 चित्ते सोडण्याच्या कार्यक्रमाला मोदींची हजेरी होतो. 


महाराष्ट्रात मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ चे आयोजन केले आहे. या पंधरवड्यामध्ये नागरिकांचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दिले. या पंधरवड्याच्या अंमलबजावणीचा मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेण्यात येणार आहे.