Pocso On Ekta Kapoor : अभिनेता जितेंद्र यांच्या कुटुंब अडचणीत सापडलंय.  प्रसिद्ध निर्माती एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांच्याविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. 'अल्ट बालाजी' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अल्पवयीन मुलींच्या अश्लील दृश्यांचे प्रदर्शन केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आलीय. 'गंदी बात' या वादग्रस्त वेब सीरिजच्या सहाव्या सीझनमुळे एकता कपूर गोत्यात अकडलीय. खरं तर एकता कपूर आणि वाद हे नविन गोष्ट नाही. पण यांचा तिच्याविरोधात गुन्हा दाखल झालाय. 'अल्ट बालाजी'ने त्यांच्या एका वेब सीरिजमध्ये अल्पवयीन मुलींचे अश्लील दृश्य फेब्रुवारी 2021 ते एप्रिल 2021 या काळात दाखवण्यात आलंय, असं तक्रारीत नमूद करण्यात आलंय. (POCSO has been registered against Ekta Kapoor along with her mother shobha kapoor)


नेमकं प्रकरण काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार तक्रारदाराने दाखल केलेल्या तक्रार पत्रात असा आरोप करण्यात आलाय की, आधी या वेब सीरिजमध्ये सिगारेटचा वापर करत महापुरुषांचा आणि संतांचा अपमान दाखविण्यात आला होता. या घटनेनंतर याच सीरिजमध्ये पोक्सोच्या नियमांचे उल्लंघन करणारी काही दृश्ये प्रदर्शित करण्यात आलंय. यामध्ये माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000, वुमन प्रोहिबिशन ॲक्ट 1976 आणि सिगारेट व इतर तंबाखु उत्पादने अधिनियम 2003 यासारख्या कायद्यांचे उल्लंघन झाल्याचे पाहिला मिळत आहे. तक्रारदाराने या सीरिजमध्ये बालकांच्या सुरक्षेसाठी असलेल्या कायद्यांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट उल्लेख केलंय. ही माहिती न्यायालयाने घेतलेल्या टिप्पण्या आणि देशभरातील बाललैंगिक घटनांच्या वाढत्या चिंतेनंतर उघडकीस आली आहे. यामुळे एकता कपूर आणि 'अल्ट बालाजी' या कंपनीच्या कामकाजावर आता गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. 


'गंदी बात' वेब सीरिज भारतातील सर्वात जास्त पाहिल्या जाणाऱ्या वेब सीरिजपैकी एक असल्याने अनेकदा वादग्रस्त चर्चांना निमंत्रण दिलंय. अशा परिस्थितीत, आता एकता कपूरवर करण्यात आलेले हे आरोप अतिशय गंभीर आहेत. तक्रारदाराने न्यायालयाकडे या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केलीय. आधुनिक डिजिटल मनोरंजनाच्या युगात, या प्रकारच्या गुन्ह्यांचे गंभीर परिणाम अतिशय वाईट होऊ शकतात, अशी नोंद केलीय. बालकांचे संरक्षण आणि त्यांच्या हक्कांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. 


दरम्यान यापूर्वी एकताने कॉन्ट्रॅक्टमध्ये न्यूडिटीचा क्लॉज तयार केला होता. कलाकारांनी न्यूड सीन देण्यास नकार देऊ नये आणि सेन्सॉर बोर्डाच्या कैचीतूनही सुटता यावं म्हणून तिने ही शक्कल लढवली होती. त्यामुळे ती वादात सापडली होती. त्यानंतर जोधा-अकबर या टीव्ही सीरिअलवरूनही तिला ट्रोल केलं होतं. या शोमध्ये तिने जोधाची व्यक्तीरेखा चुकीची दाखवली असा आरोप राजपूत क्षत्रिय अखिल भारतीय सभेने केला होता. तिच्याविरोधात जोरदार निदर्शने केल्यानतंर ही सीरियल बंद करण्यात आली. एवढंच नाही तर एकता दृश्यम या मल्याळम सिनेमाच्या निर्मात्यांसोबतही वाद अडकली होती. त्यानतंर राजीव खंडेलवालसोबतचे मतभेद आणि ट्रीपल एक्स या वेब सीरिजमध्ये तिने जवानांच्या पत्नींची व्यक्तिरेखा चुकीच्या पद्धतीने दाखवली म्हणून सैनिक नाराज झाले होते.