ड्रग्स प्रकरणी विवेक ओबेरॉयच्या घरी पोलिसांचा छापा
प्रकरणाला वेगळं वळण...
मुंबई : बॉलिवूड अभिनेता विवेक ऑबेरॉयच्या घरी पोलिसांनी छापा टाकला आहे. बंगळूरू सिटी क्राईम ब्रांचने ड्रग्स प्रकरणातील एका व्यक्तीच्या शोधात विवेकच्या घरी छापा टाकला. ड्रग्स प्रकरणी पोलीस ज्या व्यक्तीच्या शोधात होते, तो विवेकच्या घरी लपल्याचा संशय असल्यामुळे पोलिसांनी विवेकचे घर गाठले. एवढचं नाही तर संबंधित व्यक्ती विवेकचा नातेवाईक असल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबईमधील कॉटनपेट ड्रग्स प्रकरणात पोलिस आदित्य अल्वा नावाच्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.
या प्रकरणी काही पुरावे हाती लागल्यानंतर पोलिसांनी विवेकच्या घरी धाव घेतली. पुलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार आदित्य अल्वा हा विवेकचा नातेवाईक आहे. त्यामुळे त्याच्या घराची चौकशी करण्यात आली. या चौकशीसाठी बंगळूरू पोलिसांचं पथक मुंबईत दाखल झालं.
दरम्यान, सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण समोर आलं आहे. याप्रकरणी आतापर्यंत अनेक बड्या कलाकारांचे नाव समोर आले आहेत. त्यामध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोन, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह यांची देखील चौकशी करण्यात आली.
शिवाय, सीबीआयच्या सांगण्यानुसार सुशांत आत्महत्ये प्रकरणी तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. अद्यापही काही मुद्द्यांमधील तथ्य समोर आलेलं नाही. त्यामुळे सीबीआयची शोध मोहिम सुरू असल्याचा खुलासा सीबीआयने केला.