`या` नवविवाहित सेलिब्रिटीचा स्विमिंगपूलमधला फोटो व्हायरल
लग्नानंतर हे नवविवाहित जोडपं चांगलचं चर्चेत आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री पूजा बत्रा आणि अभिनेता नवाब शाह नुकताच विवाह बंधनात अडकले आहेत. लग्नानंतर हे नवविवाहित जोडपं चांगलचं चर्चेत आहे. पूजा बत्रा सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ देखील भलतेच व्हायरल होत असतात. शिवाय तिने तिच्या लग्नाची बातमी देखील सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्यांना सांगितली होती. सध्या पूजा बत्रा आणि पती नवाबचा एक फोटो चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे.
स्विमसूटमध्ये असलेल्या पूजाच्या अदा चाहत्यांना घायाळ करत आहे. हा फोटो खूद्द नवाबने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट केला आहे. स्विमसूटमधील फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये 'सनडे फनडे' असे लिहले आहे. दोघेही त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करत असतात.
पूजाने एका मुलाखती दरम्यान आपण विवाह बंधनात अडकल्याचा खुलासा केला होता. ५ महिन्याच्या ओळखीनंतर पूजा-नवाबने लग्नगाठ बांधली. दोघांच्या एका मित्राने त्यांची ओळख करून दिली होती. अखेर या ओळखीचे रूपांतर अयुष्यातील फार महत्वाच्या नात्यात झाले.
पुढे घरातल्या मंडळींसमोरही त्याने पूजासाठीचा विवाहप्रस्ताव ठेवला. पूजा आणि नवाबच्या सोशल मीडिया पोस्ट पाहता त्यांच्या नात्यात आलेली ही सुरेख बाजू अनेकांसाठी #CoupleGoals देत आहेत.