मुंबई :  इंडस्ट्रीमध्ये कलाकारांच्या रिलेशनशिपच्या चर्चा तुफान रंगत असतात. नुकताचं अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरचं लग्न झालं आहे. महेश भट्ट आणि कपूर कुटुंबाचे व्याही झाले आहेत, पण यापुर्वी महेश भट्ट खान कुटुंबाचे व्याही झाले आसते. कारण भट्ट कुटुंबाची मुलगी पूजा आणि सोहेल खान दोघे एकमेकांना डेट करत होते. पण त्यांचं नात अधिक काळ टिकू शकलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूजा आणि सोहेल यांचं नातं 
अभिनेता सलमान खानचा भाऊ सोहेलचं सीमा खानसोबत लग्न होण्यापूर्वी तो पूजासोबत रिलेशनशिपमध्ये होता. दोघांनी लग्न करण्याचा देखील विचार केला. एका मुलाखतीत पूजाने त्यांच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. 


सोहेल आणि पूजाने तेव्हा लग्न करण्यचा विचार केला, पण अभिनेता सलमान खानमुळे दोघांचं लग्न होऊ शकलं नसल्याची खंत पूजाने व्यक्त केली. सलमान आणि पूजा दोघांमध्ये वाद असल्यामुळे पूजा आणि सोहेलचं लग्न होऊ शकलं नाही. 


लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देखील दोघांने नातं फार काळ टिकलं नाही. सोहेल खानने 1998 मध्ये सीमा खानशी लग्न केले आणि त्यांना दोन मुले देखील आहेत, तर दुसरीकडे पूजा भट्टने 2004 मध्ये बिझनेसमन मनीष माखिजासोबत लग्न केले. पण  2011 मध्ये  मनीष माखिजा आणि पूजा विभक्त झाले.