मुंबई : ‘बाहुबली’ या सिनेमातून जगभरात लोकप्रिय झालेला अभिनेता प्रभास सध्या ‘साहो’ सिनेमाचं शूटिंग करत आहे. या सिनेमात त्याच्यासोबत श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसेल. आता त्याच्या ‘साहो’नंतरच्या प्रोजेक्टचीही माहिती समोर आलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रभास ‘साहो’नंतर करणार असल्या सिनेमाची माहिती समोर आली आहे. या सिनेमात प्रभास सोबत अभिनेत्री पूजा हेगडे ही दिसणार आहे. पूजाने आपलं बॉलिवूड करिअर ‘मोहनजोदडो’ या सिनेमाने केली होती. या सिनेमात ती अभिनेता हृतिक रोशनसोबत दिसतील होती. 


प्रभासच्या ‘साहो’चं दिग्दर्शन सूजीत रेड्डी करत आहे. या सिनेमात श्रद्धा कपूर सोबतच नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, चंकी पांडे आणि मंदिरा बेदी यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. हा सिनेमा तेलुगु आणि हिंदीमध्ये रिलीज होणार आहे. 


प्रभासच्या ‘साहो’नंतरच्या प्रोजेक्टमध्ये पूजा हेगडे त्याच्यासोबत दिसणार आहे. खरंतर पूजा हेगडेच्या दृष्टीने ही मोठी आहे. कारण पूजाचा पहिला बॉलिवूड सिनेमा फ्लॉप झाला होता. त्यामुळे आता तिची ही नवीन संधी तिला काय मार्ग दाखवते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.