COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : आपल्या अंदांनी आणि बोल्डनेसने कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री - मॉडेल पूनम पांडेने आपल्या आगामी सिनेमाचा खुलासा सोशल मीडियावर केला आहे. त्यानंतर पूनम पांडेचे चाहते या ट्रेलरची वाट पाहत आहे. अखेर पूनमच्या 'द जर्नी ऑफ कर्मा' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पूनमचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. मात्र तुम्हाला ट्रेलर बघून धक्का बसेल कारण यामध्ये शक्ती कपूर यांचा देखील बोल्ड अंदाज आहे. 


पूनम पांडेने आपल्या बॉलिवूड करिअरला सुरूवात 'नशा' या सिनेमातून केलं आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर काही खास कलेक्शन केलेलं नाही. पण या सिनेमातील पूनम पांडेच्या बोल्डनेसमुळे सगळ्यांची तिची दखल घेतली. 'द जर्नी ऑफ कर्मा' या सिनेमातून पुन्हा एकदा पूनम पांडेसमोर आली आहे. 



'द जर्नी ऑफ कर्मा'  हा सिनेमा अतिशय बोल्ड आणि हॉट सीनने भरलेला आहे. खूप दिवसांनी शक्ती कपूर मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. 65 वर्षांचे शक्ती कपूर या सिनेमांत पूनम पांडेसोबत बोल्ड लूकमध्ये दिसणार आहे.