Poonam Pandey Look : बोल्ड ड्रेस परिधान करून पाणीपुरी खाण्यासाठी निघाली पूनम पांडे; व्हिडिओ पाहून चाहते हैराण
बोल्ड स्टाइलसाठी ओळखली जाणारी पूनम पांडे प्रत्येक वेळी असं काही करते की तिचा व्हिडिओ व्हायरल होतोच.
मुंबई : बोल्ड स्टाइलसाठी ओळखली जाणारी पूनम पांडे प्रत्येक वेळी असं काही करते की तिचा व्हिडिओ व्हायरल होतोच होतो. यावेळीही पूनम पांडे मुंबईत घराबाहेर पाणीपुरी खायला गेली तेव्हा तिची स्टाइल पाहून लोक दंग झाले. यावेळी अभिनेत्रीने अधिक खुलून येणारे कपडे परिधान केले होते आणि पापाराझींना पाहून असं कृत्य करू लागले की सर्व काही कॅमेऱ्यात कैद झालं. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पूनम पांडे नेहमीप्रमाणेच तिच्या बोल्ड स्टाईलने लोकांना बेकाबू करताना दिसली.
घातले रिवीलिंग कपडे
यावेळी पूनम पांडेने पांढऱ्या रंगाचा बॅकलेस ब्रा स्टाइल टॉप परिधान केलेला दिसत होता. अभिनेत्रीच्या या टॉपला मागच्या बाजूने एकट नॉटवर बांधण्यात आलंय. तसंच, अभिनेत्रीचा डिपनेक त्यात स्पष्टपणे दिसत होता. पूनम या टॉपसोबत मिनी स्कर्ट परिधान करताना दिसली. हा स्कर्ट खूप घट्ट असल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये पूनम पांडे पाणीपुरी खाताना दिसत आहे. अभिनेत्रीने फक्त दोन पाणीपुरी घेतल्या. ज्यावर पापाराझींनी तिला फक्त दोन प्रश्न विचारले. यावर प्रतिक्रिया देताना अभिनेत्री म्हणाली- 'जगण्यासाठी एवढंच आहे.. नाहीतर अजून डंबेल मारावे लागतील.' यानंतर आपल्या बोल्ड अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या पूनम पांडेने कॅमेऱ्यासमोर सर्वांना विचारू लागली पाणीपुरी 'खाओगे'. पूनम पांडेचा हा बोल्ड लूक आणि स्टाइल दोन्ही पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.