मुंबई : पूनम पांडे नेहमीच तिच्या बोल्ड इमेजमुळे नेहमी चर्चेत असते. नुकतीच पूनम पांडे कंगना राणौतचा रिएलिटी शो 'लॉकअप'मधून बाहेर पडली आहे. शोमधून बाहेर पडताच पूनम पांडेने आणखी एक खुलासा केला आहे. अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत असा खुलासा केला आहे. ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केला मोठा खुलासा 
पूनम पांडेने दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित हा मोठा खुलासा केला आहे. पूनम पांडे म्हणाली, 'मला वास येत नाही. मी माझ्या आजूबाजूच्या लोकांना स्मेलबद्दल विचारते आणि आता मी अशाप्रकारे गोष्टींचा वास घेते.


घरगुती हिंसाचारानंतर घडला हा प्रकार 
कौटुंबिक हिंसाचारानंतर पूनम पांडेच्या परिस्थितीविषयी बोलताना ती म्हणाली की, 'जेव्हा मला घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागला तेव्हा माझी स्मेलची जाणीव पूर्णपणे हरवली होती. हे माझ्या ब्रेन हॅमरेजशी जोडलेलं आहे. पण आता मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत आहे.


लॉकअपमध्ये उघडकीस आला हा प्रकार 
विशेष म्हणजे कंगना राणौतच्या शोमध्ये पूनम पांडेने सॅम बॉम्बेबद्दल आणखी एक खुलासा केला आहे. अभिनेत्रीने शोमध्ये सांगितलं होतं की, 'तिच्या मेंदूला झालेली दुखापत अद्याप बरी झालेली नाही. कारण सॅम तिला त्याच जागी पुन्हा पुन्हा मारहाण करायचा. यासोबतच अभिनेत्रीने सांगितलं की, तिची अवस्था अशी झाली होती की, ती मेकअप करून अंगावरील जखमा लपवायची.