मुंबई : अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) हल्लीच पती सॅम बॉम्बे (Sam Bombay) पासून वेगळी झाली आहे. दोघांमधील नातं गेल्याकाही दिवसांपासून चांगल नाही. यामुळे दोघांनी आपले रस्ते वेगळे करण्याचा निर्णय घेतला. पतीसोबतच्या या नात्यातून पूनमला एवढा मोठा धक्का बसलाय की, तिने यापुढे काही काळ कुणालाही डेट न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच तिला यापुढे कसा जोडीदार हवा? हे देखील सांगितलं आहे. 


सध्या सिंगल आहे पूनम पांडे 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टेलीटॉकला दिलेल्या मुलाखतीदरम्यान पूनम पांडे म्हणाली, मी ज्या टप्प्यातून गेले आहे त्यातून मी हळूहळू बाहेर पडत आहे. मी पूर्वीप्रमाणेच सेक्सी दिसण्याचा प्रयत्न करत आहे. 



जेव्हा पूनमला विचारण्यात आले की तू आता सिंगल आहेस का? याला उत्तर देताना पूनम म्हणते की, मी सध्या रिलेशनशिपमध्ये आहे, तेही माझ्यासोबत. खूप मजा येते. हे जीवन खूप रोमांचक आहे. एकटे राहणे हेच सध्या चांगले आहे. पुढील ५ वर्षे मी अविवाहितच राहणार आहे.


विक्की कौशल सारखा नवरा हवाय पूनम पांडे


पूनम पांडेला लग्नाबाबत विचारण्यात आलं. तुम्ही लग्न केलं, सगळंकाही ठिक होतं. मग अचानक नेमकं काय झालं? ज्यामुळे सगळंच संपलं? पूनमने या प्रश्नाचं उत्तर सरळ दिलं नाही. मात्र ती म्हणाली की, मी सध्या एका थेरेपिस्टकडे जाते. हळूहळू या प्रसंगातून सावरतेय. 


सध्या पूनम पांडे आपल्या कामावर लक्षकेंद्रीत करत आहे. या दरम्यान पून पांडेने आपण अभिनेत्री कतरिना कैफकडून प्रेरणा घेत असल्याचं सांगितलं. कतरिनाचे असंख्य चाहते आहे. इंडस्ट्रीमध्ये तिने खूप चांगल काम केलंय. 


कतरिनाने खूप चांगल्या माणसासोबत काम केलंय. मलापण अशी व्यक्ती भेटली तर मी देखील लग्न करेन हे सांगायलाही पूनम पांडे विसरलेली नाही.