मुंबई : 'भयभीत' या सिनेमातून अभिनेत्री पूर्वा गोखले रुपेरी पडद्यावर झळकणार असून या चित्रपटात ती महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता सुबोध भावेदेखील स्क्रीन शेअर करणार आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भय आणि भीतीच्या कोड्याचा लंपडाव, असं म्हणतं सुबोधने या सिनेमाचा टीझर शेअर केलं आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन ऍक्च्युअल मुव्हीज प्रोडक्शन्स ब्राऊन सॅक फिल्म्स प्रा. लि. प्रस्तुती असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन दीपक नायडू यांनी केलं आहे. हा सिनेमा 28 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 



'कुलवधू' या मालिकेमध्ये पूर्वा आणि सुबोधने एकत्र काम केलं होतं. या मालिकेनंतर ही जोडी एकत्र झळकली नाही. 'भयभीत' या सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांची ही इच्छा पूर्ण होणार आहे.