Pop singer Aaron Carter No More:  संगीत विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध गायक आणि रॅपर अॅरॉन  कार्टर (Aaron Carter) चं निधन झालं. वयाच्या 34 वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. अॅरॉनच्या निधनाबाबत कळताच चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे (aaron carter dead). अॅरॉनच्या निधनानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना त्याला श्रद्धांजली वाहिली. गायकाचा मृतदेह दक्षिण कॅलिफोर्नियातील घरात संशयास्पद अवस्थेत आढळला आहे. (rip aaron carter)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिंगरचा मृतदेह दक्षिण कॅलिफोर्नियातील त्याच्या घरातून संशयास्पद परिस्थितीत सापडला (aaron carter 2022). अॅरॉनच्या निधनाचं कारण अद्यापही कळू शकलेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, अॅरॉनच्या निधनाची माहिती त्याच्या मॅनेजरने दिली आहे. (aaron carter interview)


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Aaron Carter (@aaroncarter)


शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास अॅरॉनचं निधन झाल्याची माहिती मिळत आहे.  पण जेव्हा गायकाचा मृतदेह राहत्या घरी संशयास्पद अवस्थेत आढळल्यानंतर त्याची ओळखही पटत नव्हती. अॅरॉनला लहानपणापासून गाण्याची आवड आहे. वयाच्या 9 व्या वर्षी अॅरॉनचा पहिला अल्बम प्रदर्शित झाला. (aaron carter last moments)