नवी दिल्ली : पंजाबच्या पटियाला कोर्टाने २००३ मध्ये झालेल्या मानव तस्करी प्रकरणी प्रसिद्ध गायक दलेर मेहंदी याला दोषी ठरवलं आहे.


दोन वर्षाचा तुरुंगवास


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा निर्णय देत कोर्टाने त्याला २ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दलेर मेहंदी विरोधात मानव तस्करीचा गुन्हा २००३ मध्ये दाखल करण्यात आला होता. त्याच्यावर शोच्या माध्यमातून त्याच्यावर लोकं परदेशात पाठवण्याचा आरोप होता. हा गुन्हा अमेरिकेत दाखल करण्यात आला होता. 




काय आहे प्रकरण?


बख्शीश सिंह नावाच्या व्यक्तीने १९ ऑक्टोबर २००३ मध्ये दलेर मेहंदी विरोधात मानव तस्करी प्रकरणी तक्रार दाखल केली होती. यात दलेर मेहंदीचा भाऊ शमशेर सिंह याचही नाव होतं. यात आरोप लावण्यात आला होता की, या दोन्ही भावांनी काही लोकांना आपल्या टीममध्ये सदस्य बनवून परदेशात पाठवले. १९९८-१९९९ मध्ये दलेर मेहंदी आपल्या टीमसोबत २ लोकांना परदेशात घेऊन गेला होता.