Kranti Redkar Instagram: दोन वर्षांपुर्वी आर्यन खान (Aryan Khan Case) ड्रग्न प्रकरणाचा देशभर गाजावाजा झाला होता त्यामुळे राजकारणही पेटलं होते. या प्रकरणात समीर वानखेडे यांच्यावर तऱ्हेतऱ्हेचे आरोप करण्यात आले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनीही वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यामध्ये पत्नी म्हणून अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) समीर वानखेडे यांच्या पाठीशी ज्या प्रकारे गंभीरपणे उभी राहिली होती त्याला दाद द्यावी तेवढीच कमी होती. आपल्याला सोशल मीडियावर अजूनही धमक्या येतात असा उल्लेख क्रांतीनं केला आहे. 'प्लॅनेट मराठी'च्या 'पटलं तर घ्या' या कार्यक्रमात तिनं याबद्दल खुलासा केला आहे. 


नेमकं काय म्हणाली क्रांती : 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

''अंडरवर्ल्ड आणि वेडे चाहते या दोन गोष्टींपासून सगळ्यात जास्त धोका आहे. ड्रग्जशी अंडरवर्ल्डचा थेट संबंध असल्यानं ते सतत अॅक्टिव्ह असतात. ते कुणाचा घर-परिवारसुद्धा बघत नाहीत. ते तुम्हाला डायरेक्ट संपवतात. दुसरी भीती वेड्या चाहत्यांकडून असते. त्यांना अॅसिड टाकायला किंवा तुमच्या मुलांबरोबर काहीही चुकीचं करायला वेळ लागत नाही. ज्या व्यक्तीच्या विरोधात तुम्ही उभे आहात, ती मोठी व्यक्ती आहे. त्यामुळे हे भय मी रोज जगते आहे. हे तुम्ही बाहेरून अनुभवू शकत नाही. माझ्या इन्स्टाग्राममध्ये नुसते धमक्यांचे मेसेज आहेत. तुम्हाला जाळून टाकू, तुमच्या कुटुंबाला संपवून टाकू, असे मेसेज मला येतात”, असं ती यावेळी म्हणाली.


प्रेक्षकांना 'रेम्बो' चित्रपटाची उत्सुकता: 


कधी कोणाची गट्टी होईल आणि कधी भांडणं याबद्दलची अजिबातच शाश्वती नसते त्यातून जीवश्य कंठश्य मैत्री ही फार कमी पाहायला मिळते. आपल्या मित्राला किंवा मैत्रीणीला पुर्णपणे ओळखणारं कोणीतरी असावं अशी आपल्या सर्वांचीच मनोमनं इच्छा असते. मनोरंजन विश्वात अशा मैत्रीची उदाहरणंही अनेक आहेत. त्यामुळे अशा मैत्रीचे किस्से पाहायला आणि वाचायलाही आपल्याला अनेकदा आवडतात. अशीच मैत्री आहे अभिनेत्री क्रांती रेडकर आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकरची. यावेळी क्रांती रेडकर आणि उर्मिला कानटेकर यांच्या 'रेम्बो' (Rainbow Movie) या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहेत.  


क्रांतीचे अनेक चित्रपट गाजले आहेत : 


अभिनेत्री क्रांती रेडकर हिनं मराठी चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:चे असे एक अढळ स्थान निर्माण केले आहे. 'काकण', 'किरण कुलकर्णी vs किरण कुलकर्णी', 'शिक्षणाच्या आयचा घो', 'जत्रा', 'खोखो', 'नो एन्ट्री' अशा काही चित्रपटांतून क्रांतीनं साकारलेल्या भुमिका लक्षवेधी ठरल्या आहेत.