मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मनोरंजन क्षेत्रामध्ये अनेक उतार चढाव सुरु आहेत. अनेक नियमांच्या बंधनामध्ये मालिकांची शुटिंग सुरु तर झालीत पण तरीही अजूनही वातावरण सर्वसामान्य व्हायला वेळ लागेलच. अशावेळेला प्रेक्षकांना जोडून ठेवण्यासाठी अनेक वाहिन्या जुन्या लोकप्रिय मालिका पुन्हा नव्याने सुरु करतायत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झी युवानेही आता लोकप्रिय मालिका 'अवघाची हा संसार' पुन्हा एकदा नव्याने सुरु करायचा निर्णय घेतलाय. यापुर्वी झी युवावर 'जुळून येती रेशीमगाठी' आणि 'वहिनीसाहेब' या दोन लोकप्रिय मालिका पुन्हा सुरु केल्या गेल्या.


२००६ मध्ये दाखवली गेलेली अवघाची संसार ही मालिका प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली होती. अभिनेत्री अमृता सुभाष आणि अभिनेता प्रसाद ओक यांच्या या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका होत्या. अमृताने यात आसावरी नावाच्या एका साध्या सरळ गावातल्या मुलीची भुमिका साकारली होती. आपल्या तत्वांशी प्रामाणिक असणारी कर्तव्यनिष्ठ अशा आसावरीचे प्रेक्षकांनी भरभरुन कौतुक केलं होतं.



तेव्हा पहायला विसरु नका अवघाची संसार ही मालिका येत्या २४ ऑगस्टपासून दररोज दुपारी ४ वाजता फक्त झी युवावर.