प्रसिद्ध विनोदवीराचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
200 हून अधिक सिनेमांत केलं काम
मुंबई : तेलुगू सिनेजगतातील लोकप्रिय कॉमेडियन वेणु माधव यांच निधन झालं आहे. त्यांच्या कुटुंबियांनी आणि डॉक्टरांनी याबाबत माहिती दिली आहे. आज दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. खूप दिवसांपासून त्यांच्या स्वास्थ बिघडले होते. वयाच्या 39 व्या वर्षी वेणु माधव यांनी अखेरचा श्वास घेतला.
तेलुगु देशम पार्टीचे प्रमुख आणि आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी देखील ट्विट करून वेणु माधव यांच्या निधनाची माहिती दिली आणि शोक व्यक्त केला.
शरीर अस्वास्थामुळे वेणु यांना रूग्णालयात दाखल केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, वेणु यांना फुफ्फुस आणि किडनी संबंधीत त्रास होता. 24 सप्टेंबर रोजी वेणु यांना सिकंदराबादच्या कॉर्पोरेट रूग्णालयात दाखल करण्यात आलं. वेणु माधव यांच्या तब्बेत अस्वास्थामुळे फक्त कुटुंबियचं नाही तर चाहते देखील हैराण होते.
तेलुगुमधील लोकप्रिय वामसी काका यांनी ट्विटरवरून वेणुला श्रद्धांजली वाहिली आहे. वेणु माधवचे आज 12.20 ला निधन झाले असून भगवान त्याच्या आत्मास शांती देवो.
वेणु माधव यांनी मिमिक्रि कलाकारच्या रुपात आपलं करिअर सुरू केलं. त्यानंतर त्यांनी कॉमेडिअनच्या रुपात सिनेमांमध्ये पाऊल ठेवलं. Sampradayam या तेलुगु सिनेमातून त्यांनी कामाला सुरूवात केली असून हा सिनेमा 1996 मध्ये हा सिनेमा रिलीज झाला. तमिळ आणि तेलुगुमध्ये जवळपास 200 सिनेमांमध्ये त्यांनी काम केलंय.
Dr Paramanandaiah Students हा सिनेमा 2016 मध्ये चित्रित झाला असून अजून रिलीज झालेला नाही. गेल्या काही वर्षांपासून वेणु माधव यांनी राजकारणात सहभाग घेतला होता. तसेच तेलुगु देशम पार्टीकरता त्यांनी प्रचार केला होता.