मढ बीचवरील तो बंगला, पॉर्न फिल्मचं रहस्य आणि अडकला कुंद्रा
मढ बीचवरील तो बंगला आणि राज कुंद्राचं पॉर्न कनेक्शन...
मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा सध्या मोठ्या अडचणीत सापडला आहे. अश्लिल फिल्म शूट केल्याप्रकरणी आणि इंटरनेटवर पोस्ट केल्याप्रकरणी त्याला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राज कुंद्राचं पॉर्न कनेक्शन समोर आल्यानंतर अनेक चर्चा वाऱ्यासारख्या पसरत आहेत. या पोर्न फिल्म निर्मितीचा आणि प्रदर्शनाचा 2021 साली फेब्रुवारी महिन्यात पर्दाफाश झाला होता. पण आता सर्व रहस्य समोर आलं आहे.
अभिनय क्षेत्रात नाव मोठं करण्यासाठी आलेल्या अभिनेत्रींना चित्रपटात काम मिळवून देण्याच्या बहाण्याने त्यांना अश्लील चित्रपटात करण्यास भाग पाडायचे आणि नंतर हे चित्रपट Porn apps च्या माध्यमातून इंटरनेटवर अपलोड करायचे. त्यानंतर हे व्हिडिओ फक्त देशातचं नाही तर परदेशात देखील वितरित करायचे.
एवढंच नाही तर या ऍप नाव असं 'हिटहॉट' होतं. धक्कादायक गोष्ट म्हणजे, त्यांचं मालाड पश्चिममधील मढ याठिकाणी असलेल्या एका बंगल्यात पॉर्न चित्रपटाचं चित्रीकरण होत असे. हा बंगला भाडेतत्त्वावर घेतला होता. या प्रकरणातील आरोपी या चित्रपटांचे ट्रेलर सोशल मीडिया साईटवरही पोस्ट करायचे.
हा सर्व प्रकार सुरू असताना एका खबऱ्याने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. एपीआय लक्ष्मीकांत साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने धाड टाकली. यामध्ये पोलिसांनी 5 जणांना अटक केली होती. त्यामधील एका मुलीची सुटका करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन अभिनेत्यांचा, तर दोन तरुणींचा समावेश होता.