मुंबई : वेब सीरिजच्या नावाखाली पॉर्न व्हिडिओ बनवून ते वेबसाईटवर अपलोड केले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर आज या प्रकरणात पोलिसांनी एका अभिनेत्रीला अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं या प्रकरणात कारवाई करत अभिनेत्री गहना वशिष्ठला अटक केली. तिने एक प्रोडक्शन हाऊस तयार करून अशाप्रकारे वेब सिरीजच्या नावाखाली पॉर्न व्हिडिओ बनवले आणि ते वेबसाईटवर अपलोड केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मढ येथील एका बंगल्यावर पोलिसांना माहिती मिळाली होती की, या ठिकाणी पॉर्नोग्राफिक शूट सुरु आहे. त्यानंतर पोलिसांनी येथे धाड टाकून ५ जणांना अटक केली. अटक केलेल्या ५ जणांपैकी २ अभिनेते आणि २ तरुणींचा समावेश होता. तरुणी सिनेजगतात करिअर करण्यासाठी आल्या होत्या. पण त्यांच्यासोबत काही तरी वेगळं घडणार आहे. याची कदाचित त्यांना कल्पना देखील नव्हती. यानंतर पोलिसांनी याचा तपास सुरु केला. ज्य़ामध्ये आता अभिनेत्री गहना वशिष्ठला देखील अटक झाली आहे. तिला न्यायालयात हजर केलं जाणार आहे.



मिस एशिया बिकनीचा खिताब जिंकणारी गहनाने जाहिराती, हिंदी आणि तेलगु सिनेमांमध्ये काम केले आहे. गहनाच्या प्रोडक्शन हाऊसने जवळपास 87 अश्लील व्हिडिओ शूट केल्याची माहिती आहे. तिने हे व्हिडिओ आपल्या वेबसाईटवर अपलोड केले. जे पाहण्यासाठी सदस्य व्हावं लागत होतं. ज्यासाठी २ हजार रुपये घेतले जात होते.



पोलिसांनी ६ मोबाईल फोन, एक लॅपटॉप, कॅमरा आणि संबंधित साहित्य, मेमरी कार्ड जप्त केलं आहे. आरोपींच्या खात्यात जमा असलेले ३६ लाख रुपये देखील पोलिसांनी जप्त केले आहेत.