Pornography Case : राज कुंद्रा अडचणीत आणल्यानंतर, आणखी चार आरोपींना अटक
पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे राज पुन्हा येईल वादाच्या भोवऱ्यात? मुंबई क्राईम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने आणखी चार आरोपींना केली अटक
मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पॉर्नोग्राफी केस प्रकरणी मोठी अपडेटसमोर येत आहे. मुंबई क्राईम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने आणखी चार आरोपींना अटक केली. वर्सोवा येथून एका आरोपीला तर बोरिवली परिसरातून तीन आरोपींना अटक करण्यात आली. त्यापैकी एक कास्टिंग डायरेक्टर आहे, आणि बाकीचे 3 त्याचे सहकारी आहेत.
वर्सोवा येथून एक आणि बोरिवली परिसरातून तीन आरोपींना अटक करण्यात आली. गुन्हा दाखल झाल्यापासून चौघेही फरार होते. या आरोपींवर मॉडेल्सना पॉर्न फिल्म शूट करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे.
अटक करण्यात आलेल्या चार आरोपींची नावे समोर आली आहेत. नरेशकुमार रामावतार पाल (29), सलीम गुलाब सय्यद (30), अब्दुल गुलाब सय्यद (24), अमन सुभाष बरनवार (22).. अशी त्यांची नावे आहेत.
पॉर्नोग्राफी केस प्रकरणी राजबद्दल सांगायचं झालं तर, त्याला 20 सप्टेंबर रोजी जामीन मंजूर झाला. या प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचने न्यायालयासमोर राज कुंद्रा आणि त्यांच्या सहकारी रायन थोर्प यांच्या विरोधात 1500 पानांची चार्जशीट दाखल केली.
राज आणि रायन थोर्प पॉर्नोग्राफी प्रकरणात मुख्य असल्याचं या चार्जशीटमध्ये म्हटलं होतं. आता या प्रकरणी पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आता याप्रकरणी चार आरोपींना अटक केल्यानंतर राज पुन्हा वादाच्या भोवऱ्यात येणाक का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.