मुंबई : भारतातील आणखी एका स्टारची एन्ट्री बॉलिवूडमध्ये होणार आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेता प्रभास हॉलिवूडच्या टॉम क्रूजसोबत स्क्रिन शेअर करणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. एका व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये टॉम क्रूजच्या ‘मिशन इम्पॉसिबल 7’मध्ये प्रभास मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे सर्वांचा  लाडका 'बाहुबली' फेम प्रभास हॉलिवूडमध्ये जाणार आसल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतू प्रभास आणि 'MI-7'चित्रपटाच्या टीमकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दिग्दर्शक क्रिस्टोफर मॅकक्वेरी यांनी पुढील म्हणजे ‘मिशन इम्पॉसिबलच्या सातव्या भागासाठी प्रभासशी संपर्क साधला असल्याचं सांगितलं जात आहे. क्रिस्टोफर मॅकक्वेरी  आणि प्रभासची ओळख 'राधे' चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान झाली आहे.


मॅक्वॅरीने 'बाहुबली' अभिनेत्याला ही कथा सांगितली आणि त्याने त्यासाठी आपली संमती दिली असल्याचं समोर येत आहे.  मिशन इम्पॉसिबल एक लोकप्रिय हेरगिरी अ‍ॅक्शन फिल्म असून चित्रपटाचा सातवा भाग लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यामध्ये टॉम क्रूज शिवाय सायमन पेग, एलेक बाल्डविन, वॅनेसा किर्बी आणि रेबेका फर्ग्यूसन दिसणार आहेत.