Prabhas Cryptic Post : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता प्रभासनं त्याच्या सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर केली आहे. प्रभासच्या या पोस्टनं त्याच्या सगळ्या चाहत्यांना गोंधळात टाकलं आहे. या पोस्टमुळे प्रभासच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे. प्रभासनं या पोस्टमध्ये आयुष्यात कोणाचीतरी एन्ट्री होणार असं म्हटलं आहे. त्यानं या व्यक्तीला डार्लिंग म्हटलं आहे. त्यांच्या या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रभासनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये प्रभासनं कॅप्शन दिलं आहे की 'डार्लिंग्स... अखेर, कोणी खास आपल्या आयुष्यात येणार आहे... प्रतिक्षा करा चेयंडी' असं त्यानं म्हटलं आहे. प्रभासची ही पोस्ट पाहिल्यानंतर हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की तो हे त्याच्या लग्नाविषयी बोलतोय का? किंवा तो त्याच्या लग्नाच्या तारखेची घोषणा करणार आहे का? 



काही लोकांनी आशा केली आहे की प्रभासची ही पोस्ट त्याचा आगामी चित्रपट ‘कल्कि 2898 एडी’ संबंधीत आहे. प्रभासच्या काही चाहत्यांनी ही पोस्ट पाहताच तिला शेअर केलं आहे. ही पोस्ट शेअर करत त्यानं लिहिलं की प्रभास नेहमी त्याच्या खासगी आयुष्याविषयी किंवा इतर गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत नाही. दरम्यान, ही पोस्ट त्याच्या  ‘कल्कि 2898 एडी’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी किंवा त्याच्या कोणत्या आगामी चित्रपटासाठी असू शकते असं अनेकांचं म्हणणं आहे. तर अनेक लोक त्याच्या लग्नाच्या घोषणेची आनंदाची बातमी ऐकण्यास आतुर आहेत, पण... आता नक्की काय आहे हे त्याच्या आगामी पोस्टवरूनच कळेल. 


दरम्यान, गेल्यावर्षी एका चॅट शोमध्ये प्रभासनं मस्करीत म्हटलं होतं की 'जेव्हा सलमान खान जेव्हा लग्न करेल त्यानंतर मी लग्न करेल.' 


हेही वाचा : मलायका अरोरानं भाडेतत्वावर दिलं आलीशान घर, दर वर्षी इतक्या टक्क्यांनी वाढणार भाडं!


'कल्कि 2898 एडी' चा गेल्या वर्षी सॅन डिएगो कॉमिक-कॉनमध्ये खूप जास्त लोकप्रियता मिळाली. त्याच्या या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शक अश्विननं केलं आहे. तर वैजयंती मूव्हीजचा हा पॅन इंडिया चित्रपट आहे. हा चित्रपट भविष्यातील एका पौराणिक गोष्टीवर आधारीत आहे. हा चित्रपट 27 जून रोजी प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जातं आहे. या आधी देखील चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख आली होती. मात्र, काही कारणांमुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. या चित्रपटातील स्टार कास्टविषयी बोलायचं झालं तर दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, दिशा पटानी आणि कमल हासन महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.