मुंबई : बाहुबली-2 चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत सगळेच रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. या यशानंतर बाहुबलीचा प्रमुख अभिनेता प्रभासला तब्बल सहा हजार मुलींनी लग्नासाठी विचारलं होतं. या सगळ्या मुलींना नकार देणाऱ्या प्रभासचं आता लग्न ठरलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रभास लवकरच लग्न करणार आहे. रासी सिमेंटचे चेअरमन भूपती राजा यांच्या नातीबरोबर प्रभासचं लग्न ठरल्याची चर्चा आहे. दोन्ही कुटुंब लग्नासाठी तयार आहेत तसंच प्रभासनंही लग्नासाठी होकार दिल्याची माहिती आहे. प्रभास किंवा त्याच्या कुटुंबियांकडून मात्र याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.


बाहुबलीच्या दोन्ही चित्रपटांसाठी प्रभास पाच वर्ष व्यस्त होता. यामुळे आता ३७ वर्षांचा प्रभास अमेरिकेत आपल्या मित्रांबरोबर सुट्टी एन्जॉय करत आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये तो भारतात परत येईल असा अंदाज आहे.