Prabhas Took Huge Amount for Project K : दाक्षिणात्य अभिनेता प्रभास हा गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या आदिपुरुष या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा हा चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकण्यास अपयशी ठरला. तर आता प्रभासच्या चाहत्यांना त्याच्या 'सालार' आणि 'प्रोजेक्ट के' या दोन चित्रपटांकडून अपेक्षा आहे. दरम्यान, या सगळ्यात प्रभासनं या चित्रपटासाठी किती मानधन घेतलं याची माहिती समोर आल्याचे म्हटले जात आहे. प्रभासनं खूप मोठी रक्कम घेतल्याचे म्हटले जात असताना आता त्यावर चित्रपट निर्मात्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रभासनं प्रोजेक्ट के साठी 150 कोटी मानधन म्हणून घेतल्याची माहिती समोर आली होती. यावर प्रोजेक्ट केची निर्माता प्रियांका दत्ता यांनी हे शक्य नाही असे म्हटले होते. ही बातमी खरी नाही तर फक्त अफवा आहे, असं त्यावेळी ती म्हणाली. बॉलिवूडमध्ये असं काही होणं ही साधारण गोष्ट आहे. अशा प्रकारच्या बातम्या तेव्हाचा बोलल्या जातात जेव्हा निर्माते यावर काही बोलत नाही. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


या चित्रपटाची पटकथा ही हिंदू पौराणिक कथांसारखी असणार आहे. ज्याप्रकारे भगवान विष्णू हे दूष्टांचा नाश करण्यासाठी प्रत्येक युगात जन्म घेतात. त्याच प्रमाणे त्यांचा आपल्या युगात जन्म होणार. पण त्यात महत्त्वाचं म्हणजे प्रभास ती भूमिका साकारणार असून कशा प्रकारे दृष्टांचा नाश होतो. हे दाखवण्यात येणार आहे. 


हेही वाचा : “इंग्रज ही कोकणस्थ ब्राह्मण मंडळी....”, नेटकऱ्याच्या या कमेंटवर मराठमोळ्या अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर


प्रोजेक्ट के हा चित्रपट पुढच्या वर्षी 12 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट एक सायन्स फिक्शन आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे नाग अश्विननं केले आहे. प्रोजेक्ट के पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. खरंतर प्रोजेक्ट के चं शूटिंग दरम्यान, अमिताभ बच्चन यांना दुखापत झाली होती. त्यामुळे या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये विलंब झाला. अमिताभ आता ठीक असून लवकरच चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. निर्मात्यांनी महाशिवारात्रीच्या निमित्तानं या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं होतं. चित्रपटाचं पोस्टर हे यूनिक आहे. तर चित्रपट पाहण्यासाठी फक्त प्रभासचे चाहते नाही तर दीपिकाचे चाहते देखील आतुर आहेत. प्रभाससोबत बॉलिवूडची अभिनेत्री दीपिका पदुकोणनं महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर कमल हासन हे चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहेत. वाईटावर चांगल्याचा विजय अशी चित्रपटाची पटकथा असणार आहे.