नव्या गाण्यावर Prajakta Mali चा `मनसे` डान्स, VIDEO VIRAL
Prajakta Mali Dance On New MNS Song : प्राजक्ता माळीच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिचं मनसेवर असलेलं प्रेम पाहायला मिळत असल्याचे काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, प्राजक्तानं डान्स करताना दिलेल्या एक्सप्रेशननं सगळ्यांना भुरळ पाडली आहे.
Prajakta Mali Dance On New MNS Song : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर प्राजक्ता स्पष्टपणे तिचं मत मांडताना दिसते. दरम्यान, नुकताच प्राजक्ताचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत प्राजक्ता मनसेच्या नवीन पक्षगीताच्या गाण्यावर डान्स करताना दिसली आहे. (MNS New Song) तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध कमेंटही केल्या आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यादरम्यान, मनसेच्या नवीन पक्षगीताचे लोकार्पण केले. मनसेचं हे नवीन गाणं लोकप्रिय गायक अवधूत गुप्तनं गायलं आहे. हे गाणं प्रदर्शित होताच त्याला प्रेक्षकांकडून खूप प्रतिसाद मिळाला आहे. याच गाण्यावर प्राजक्तानं डान्स केला आहे.
पाहा प्राजक्ताचा डान्स -
प्राजक्ताच्या या डान्सचा व्हिडीओ हा राज ठाकरे यांच्या एका फॅनपेजवर शेअर करण्यात आला आहे. प्राजक्ताचे या गाण्यावर नाचतानाचे भाव लक्ष वेधून घेणारे आहेत. या गाण्यात प्राजक्ता बिनधास्त आणि बेधडकपणे डान्स करताना दिसत आहे. मनसेचं हे गाणं 5 मिनिटांचं आहे. या गाण्याचे बोलं 'प्रश्न जिथे मनसेचा, मार्ग तिथे मनसेचा, नवनिर्माण घडवूया, मनसे…' असे आहेत. प्राजक्ताचा हा डान्स मनसेच्या ठाणे शाखेच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून देखील शेअर करण्यात आला आहे.
प्राजक्ता माळीच्या या डान्स व्हिडीओवर कमेंट करत तिचं मनसेवर असलेलं प्रेम दिसत असल्याचं म्हटलं आहे. तर एक नेटकरी म्हणाला, 'महाराष्ट्राची मराठमोळी शेरणी...' दुसरा नेटकरी म्हणाला, 'लोकांना सांगायचं हे दणक्यात साजरं करा आणि आपण आपलं सुमडीत परदेशात निघून जायचं हे यांचं नवनिर्माण.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'नुसत गाण्यावर नाचून चालणार नाय , सरकार मनसेच आल पाहिजे असं काहीतरी करा.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'हे गाणच एवढ भारी आहे की जनतेच्या हृदयावर राज्य करतय फक्त #राजसाहेब ठाकरे जे हिंदुत्वाकरिता आम्ही त्यांच्या करिता.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'प्राजक्ता तुझे हावभाव खूप सुंदर होते आणि हे गाणं पण तितकंच सुंदर आहे.'
हेही वाचा : Photo : Priyanka Chopra ची बातच न्यारी, अंबानींच्या सोहळ्यासाठी नेसली 60 वर्षे जुनी बनारसी Saree
दरम्यान, प्राजक्ता माळी आणि राज ठाकरे यांचे घनिष्ट संबंध आहेत. ती नेहमीच त्यांच्या सभेला हजर राहिल्याचे आपण पाहतो. काही महिन्यांपूर्वी प्राजक्तानं अस्सल मराठमोळ्या दागिण्यांना जपण्यासाठी पारंपरिक, घरंदाज असे दागिण्यांचे प्राजक्ताराज हे ब्रॅंड सुरु केलं आहे. तिच्या या ब्रँडचे अनावरण हे राज ठाकरे यांच्या हस्तेच झाले होते.