Prajakta Mali: `प्राजक्तराज`ची अभिनेता सोनु सूदलाही भूरळ, प्राजक्ता माळीकडून खास पोस्ट शेअर
Prajakta Mali: मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं फॅन फॉलोईंग खूप आहे. प्राजक्ता ही सोशल मीडियावर (Marathi Actress Prajakta Mali) खूप सक्रिय असते. सध्या तिच्या एका पोस्टची सर्वत्र चर्चा सुरू आहे. प्राजक्ता माळीनं `प्राजक्तराज` (Prajaktaraj) हे नवं ज्वेलरी कलेक्शन लॉन्च केलं आहे.
Prajakta Mali: मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं फॅन फॉलोईंग खूप आहे. प्राजक्ता ही सोशल मीडियावर (Marathi Actress Prajakta Mali) खूप सक्रिय असते. सध्या तिच्या एका पोस्टची सर्वत्र चर्चा सुरू आहे. प्राजक्ता माळीनं 'प्राजक्तराज' (Prajaktaraj) हे नवं ज्वेलरी कलेक्शन लॉन्च केलं आहे. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष आणि इतिहासप्रेमी राज ठाकरेंनी (MNS Leader Raj Thackeray) उपस्थित लावली होती. त्यांच्या हस्ते 'प्राजक्तराज'चं अनावरण करण्यात आलं. सध्या सगळीकडेच प्राजक्ताच्या या नव्या कलेक्शनची क्रेझ आहे. या नव्या वेन्चरमुळेही प्राजक्ता माळी चर्चेत आली आहे. प्राजक्तराज या ज्वेलरी कलेक्शनची दखल बॉलिवूड अभिनेता सोनु सूद यानंही घेतली आहे. (prajakta mali shares an instagram post on sonu sood praises her prajaktaraj collection)
प्राजक्ता माळीनं मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:च असं अढळं स्थान निर्माण केलं आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात अभिनेता सोनू सुदनं हजेरी लावली होती. त्याचबरोबर या कार्यक्रमाला प्राजक्तानंही उपस्थिती लावली होती. हा ब्रम्हपूरी महोत्सव (Brahmapuri Mahotsav) होता यावेळी प्राजक्ताच्या प्राजक्तराज या कलेक्शनचंही खूप कौतुक करण्यात आलं. प्राजक्ता माळीनं इन्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे ज्यात तिनं ब्रम्हपूरी महोत्सवाचे काही फोटोज शेअर केले आहेत. या फोटोंच्या कॅप्शनखाली तिनं लिहिलं आहे की, ब्रम्हपुरी महोत्सवात 'प्राजक्तराज'विषयी महोत्सवाइतकं बोललं गेलं; की मी भारावून गेले… खूप आभार… ठरवून टाकलं; 'प्राजक्तराज'चं पहिलं प्रदर्शन विदर्भात लागणार…'भद्रावती'… वेळ-दिवस लवकरच कळवेन… By the way.. सोनू सूद ही म्हणाले, 'गळ्यातलं unique आहे..' अर्थातच @prajaktarajsaaj ची ‘वज्रटिक’ परिधान केली होती.. अशी पोस्ट लिहून तिनं काही इमोजींजही शेअर केले आहेत.
आपल्या प्राजक्ताराज या कलेक्शनची वज्रटिका (Vajratika) प्राजक्तानं यावेळी परिधान केली होती. तिनं हिरव्या रंगाची आणि गुलाबी काठपदाराची साडी परिधान केली होती आणि पारंपारिक दागिनेही घातले होते. ती या मराठमोळ्या लुकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. प्राजक्तानं आपल्या या नव्या दागिन्यांच्या ब्रॅण्डचा बिझनेस (Brand and Business) सुरू केला आहे.
हेही वाचा - Shocking: नवऱ्याने असं काय केलं? दुसऱ्याच दिवशी नवरी कायमची सोडून निघून गेली
या ब्रॅण्डमधून अस्सल मराठमोळ्या आणि पारंपारिक दागिन्यांचे कलेक्शन पाहायला मिळणार आहे. यावेळी बॉलिवूड अभिनेता सोनू सुदनंही तिच्या प्राजक्तराज कलेक्शनचं कौतुक केलं ज्याची माहिती प्राजक्तानं इन्टाग्रामवरून दिली.
सोनु सूदसोबतचा एक फोटोही प्राजक्तानं यावेळी पोस्ट केला आहे. प्राजक्तानं गळ्यात घातलेली वज्रटिका पाहून सोनु सोदू तिला म्हणाला की, तूमचं गळ्यातलं खूप युनिक आहे. तिच्या या पोस्टला तिच्या चाहत्यांकडूनही कौतुकाचा वर्षाव होतो आहे. आपल्या ब्रॅण्डचं नवं कलेक्शन हे विदर्भात असेल आणि त्याचं नावंही भद्रावती (Prajaktaraj New Collection) असं असेल असेही प्राजक्तानं यावेळी नमूद केलं आहे.