मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीनं अभिनय सोडून सुरु केलं...
मराठमोळी अभिनेत्री Prajakta Mali चे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. या फोटोंवरून नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत.
Prajakta Mali Traditional Photo's : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. प्राजक्ता ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. प्राजक्ताचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत प्राजक्ता चाहत्यांच्या संपर्कात राहते. काही दिवसांपूर्वी प्राजक्ताची रानबाजार ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. प्राजक्ता माळीची ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या वेब सीरिजमध्ये प्राजक्ता माळीचे बोल्ड सीन पासून प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दरम्यान, सध्या प्राजक्ताचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर प्राजक्ताच्या अनेक चाहत्यांना प्रश्न पडला की तिनं अभिनय क्षेत्र सोडलं की काय...
प्राजक्ता माळीनं तिच्या फेसबुक अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या वेळी प्राजक्तानं काही फोटो शेअर केले आहे. या फोटोंमध्ये प्राजक्तानं पांढऱ्या रंगाची कुर्ती आणि मल्टी कलर ओढणी घेतली आहे. तर इतर फोटोंमध्ये प्राजक्तानं जांभळ्या रंगाची साडी नेसली आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर करत बंगळुरूच्या आश्रममध्ये आणि थोडं फिरली ते पण 'प्राजक्ताराज'च्या म्हाळसा कलेक्शनमध्ये असे कॅप्शन प्राजक्तानं दिलं आहे. (Prajakta Mali Photo)
प्राजक्ताची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी प्राजक्ताला प्रश्न केला की तू अभिनय सोडून हेच काम करणार आहेस का? दरम्यान, काही नेटकऱ्यांनी प्राजक्ताची ही स्टाईल त्यांना खूप आवडल्याचे दिसते. काही नेटकऱ्यांनी प्राजक्ताला तिचं प्राजक्ताराजचं कलेक्शन हे खूप अप्रतिम आहे असे देखील अनेकांनी सांगितले. (Prajakta Mali Bold Photo)
हेही वाचा : 65 व्या वर्षी इंटीमेट सीन, प्रियांका चोप्रासोबत वाद ते दोन वेळा लग्न..., असे आहे Annu Kapoor यांचे आयुष्य
दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्राजक्ता ही रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जात होते. तर तसं काही नसून तिनं ही पोस्ट वर्ल्ड फूड डे निमित्ताने शेअर केली होती. यावेळी तिने तिचे आणि काही पदार्थांचे भन्नाट फोटो पोस्ट करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र त्या सोबतच तिने आणखी एक फोटो शेअर केला ज्यात ती एका मुलासोबत दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिलं, 'वर्ल्ड फूड डेच्या शुभेच्छा. त्या व्यक्तीचं देखील खूप कौतुक केलं. जो फक्त तुम्हाला पाहण्यासाठी आणि तुमच्यासोबत जेवणासाठी पुणे मुंबई असा प्रवास करतो. खूप खूप धन्यवाद भावा.' ही पोस्ट जरी जूनी असली तरी सोशल मीडियावर ही पोस्ट पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.