`हास्यजत्रे`च्या सेटवर वनिताच्या जादूची कमाल, Video Viral
वनिता खरातच्या `जादूच्या व्हिडीओ` ची सोशल मीडियावर चर्चा, प्रसाद खांडेकरने म्हणाला...
मुंबई- अभिनेत्री वनिता खरात ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. वनिता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा मराठी कॉमेडी शो लोकप्रिय आहे. या शोमधील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिकंली आहेत. हे सगळे कलाकार सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. नुकताच प्रसाद खांडेकरने वनिताचा एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
प्रसादने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा मजेशीर व्हिडीओ प्रसादने वनिताच्या वाढदिवसानिमित्ताने शेअर केला होता. या व्हिडीओत वनिता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या सेटवर झोपल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत "जादूचा व्हिडीओ, हा व्हिडीओ ऑन केला की तुम्ही २ काऊंट मोजा आणि 'वने sssssss' अशी जोरात हाक मारा, मग जादू होईल वनी तुमच्याकडे बघेल मग तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या.... आज आमच्या वनीचा बबड्याचा वाढदिवस आहे," असे प्रसादने कॅप्शन दिले.
पुढे कॅप्शनमध्ये प्रसाद म्हणाला, "वनी वाढदिवसाच्या शुभेच्छा! आमच्या सेट वरील सगळ्यांची लाडकी, सगळ्यांकडे हक्काने हट्ट करून स्वतःचे लाड पूरवून घेणारी वनी... वने तुला आयुष्यात जे जे हवं ते ते सगळं तुला मिळो आणि आता आहेस तशीच हसत, खेळत आणि बागडत राहा ....बाकी दाद आहेच खूप खूप प्रेम वने." वनिताने ‘कबीर सिंग’ या हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे.