मुंबई : मराठी मनावर काही दशकं राज्य करणाऱ्या बड्या लोकनेत्याचा जीवनपट मोठ्या पडद्यावर आला आणि नव्या पिढीला आनंद दिघे कळाले.  कट्टर शिवसैनिक काय असतो, हे सांगण्यासाठी आधी आनंद दिघे व्हावं लागतं असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.  शिवसेनेचं एक पर्व गाजवणारे आणि ठाणेकरांसाठी विशेष जीव ओतणारा नेता म्हणून आनंद दिघे यांच्याकडे सातत्यानं पाहिलं गेलं.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

13 मे रोजी दिघे साहेबांचा जीवनपट पडद्यावर आला आणि पहिल्याचं दिवशी सिनेमाने दणदणीत विक्रम रचला. बॉक्स ऑफिसवर देखील सिनेमाने तुफान मजल मारली. आता पुन्हा 'धर्मवीर' सिनेमाच्या नावावर यंदाच्या वर्षातील मोठा विक्रम रचला आहे. 


'धर्मवीर' सिनेमाला 'कै. शाहीर दादा कोंडके स्मृती गौरव सन्मान' मिळाला आहे. अभिनेता प्रसाद ओकने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानत  सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला आहे. 



प्रसाद म्हणतो की, 'धर्मवीर साठी या वर्षीचा "दादा कोंडके स्मृती गौरव सन्मान" मला मिळाला. हा सन्मान मी मा. आनंद दिघे साहेबांना समर्पित करतो. ही संधी मला दिल्याबद्दल दिग्दर्शक मित्र प्रवीण तरडे आणि निर्माते मित्र मंगेश देसाई यांचे मनःपूर्वक आभार. त्याचबरोबर खा.मा. श्रीकांतजी शिंदे आणि मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचेही मनःपूर्वक आभार.' 


आनंद दिघे यांच्या राजकीय कारकिर्दीत नेमक्या कोणत्या घडामोडी घडल्या आणि त्या प्रत्येक प्रसंगाला ते कसे सामोरे गेले हे सर्वच या चित्रपटातून साकारण्यात आलं आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित या चित्रपटामध्ये अभिनेता प्रसाद ओक यानं मध्यवर्ती भूमिका साकारली आहे.


प्रसादने साकारलेले आनंद दिघे पाहताना त्यानं या व्यक्तीरेखेसाठी घेतलेली मेहनत लगेचच लक्षात येत आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणं, हिंदूच्या पाठी ठाम उभं राहाणं, महिलांना सुरक्षितता देणं, सामाजिक तंटे सोडवणं, ठाण्याचा विकास करणं अशी अनेक काम दिघेसाहेबांनी केली आहेत.