मुंबई : 'हक दोगे तो रामयाण शुरू होगी, और छिनोगे तो महाभारत...' असं म्हणत संजू बाबाच्या 'प्रस्थानम' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटाची कथा राजकारना भोवती फिरताना दिसत आहे. त्यामध्ये आपल्या हक्कांच्या मागणीवर लढताना दिसत आहेत. चित्रपट २० डिसेंबर रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. अभिनेता संजय दत्तच्या वाढदिवसाचे औचित्य साधत चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


होम प्रॉडक्शनच्या खाली साकारण्यात आलेल्या 'प्रस्थानम' चित्रपटामध्ये अनेक कलाकारांची मेजवाणी चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे. चित्रपटात संजय दत्त शिवाय अभिनेता जॅकी श्रॉफ, मनीषा कोयराला, चंकी पांडे आणि अली फजल हे कलाकार भूमिका साकारणार आहेत. सोशल मीडियावर चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.