`आमचं ठरलंय`च्या घोषणेनंतर प्रथमेश-मुग्धाचं पहिलं केळवण, लग्न जवळ आलं?
Prathamesh Laghate Mugdha Vaishampayan: `आमचं ठरलंय`च्या घोषणेनंतर आता प्रथमेश लघाटे - मुग्धा यांच्या लग्नाची तारीख जवळ आली आहे. आता त्याच्या केळवाणांना सुरुवात झाली आहे. पहिले केळवण हे चिपळूण येथे पार पडले. अतिशय आग्रहाने चतुरंग प्रतिष्ठानच्या टीमने प्रथमेशचे जोरदार स्वागत केले.
Prathamesh Laghate Mugdha Vaishampayan Kelvan: 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' फेम प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी 'आमचं ठरलंय' अशी समाजमाध्यमांवर पोस्ट केली आणि त्यांच्या लग्नाची गोड बातमी जोरदार व्हायरल झाली. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. त्यांचे जमलं कसं, याची लव्हस्टोरी पुढे येऊ लागली. घरच्यांनी होकार दिल्यानंतर त्यांनी आपलं प्रेम जाहीर केलं. आता लग्न जवळ आल्याची चाहूल मिळू लागली आहे. 'आमचं ठरलंय'च्या घोषणेनंतर प्रथमेश लघाटेचे पहिलं केळवण झाले. चिपळूण येथील चतुरंग प्रतिष्ठानने पहिल्या केळवणाचा बेत आखला. यावेळी प्रथमेश लघाटे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
मोदक-मॉनिटर या टोपन नावाने प्रसिद्ध असणारा सारेगमप लिटिल चॅम्प्स प्रथमेश लघाटे लवकरच मुग्धा वैशंपायन हिच्यासोबत सातफेरे घेणार आहे. त्याआधी त्याच्या केळवणाची लगबग सुरु झाली आहे. केळवणांचा शुभारंभ चिपळूण येथील 'चतुरंग' ने आयोजित केला होता. 'चतुरंग' च्या पूर्ण टीमने त्याचे जोरदार स्वागत केले. काही दिवसांपूर्वीच प्रथमेश आणि मुग्धा एकमेकांना डेट करत असल्याचा खुलासा सोशल मीडियावर केला आणि त्यानंतर त्या दोघांवर कौतुकाचा आणि अभिनंदाचा वर्षाव होतच आहे.
पहिले प्रथमेशचे केळवण
छोट्या पडद्यावरील सारेगमप लिटिल चॅम्प्स (Sa Re Ga Ma Pa Little Champs) या कार्यक्रमातील पंचरत्नांपैकी मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे हे दोघेजण त्यांच्या गाण्यांमुळे तसेच त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यामुळे खूपच चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रथमेश आणि मुग्धा यांनी 'आमचं ठरलंय' असं जाहीर केले. त्यानंतर पहिले प्रथमेशचे केळवण झाले. याचा प्रथमेशने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात पारंपारिक पद्धतीने त्याचे स्वागत करण्यात आले. त्याची ओवळणी करण्यात आल्यानंतर गोडधोड खाण्याचा बेत दिसून आला.
गायक प्रथमेशने पहिल्या केळवणाच्या दिवशी छान उखाणाघेतला. वाढलेलं पान रिकामं केलं एकेक घास घेत घेत, चतुरंगच्या कार्यालयामध्ये माझ्या केळवणाचा जमला फक्कड बेत, असा त्याने उखाणा त्याने घेतला. त्यानंतर त्यांने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अतिशय पारंपरिक पद्धतीने, प्रचंड आपुलकीने, पंच पक्वांनाचे जेवण अतिशय आग्रहाने खाऊ घालून माझ्या केळवणांचा शुभारंभ 'चतुरंग'ने केला त्याबद्दल 'चतुरंग'च्या पूर्ण टीम ला खूप खूप धन्यवाद!
आणि त्यांच्यात प्रेम फुललं...
'सारेगमप लिटिल चॅम्प्स'च्या पहिल्या पर्वात मुग्धा आणि प्रथमेश सहभागी झाले होते. 2008 साली हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तो खूपच लोकप्रिय झाला होता. या कार्यक्रमादरम्यान दोघांची चांगली मैत्री झाली. पुढे त्यांनी गाण्यांचे अनेक कार्यक्रम केले. या कार्यक्रमामुळे ते एकमेकांच्या चांगले संपर्कात आले आणि दोघांच्याही मनात एकमेकांविषयी भावना निर्माण झाल्या आणि त्यांच्यात प्रेम फुललं.