Prathamesh Laghate Mugha Mother Birthday Post: प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांच्या लग्नाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. काही दिवसांपुर्वी प्रथमेश लघाटेच्या केळवणाचीही चांगलीच चर्चा रंगलेली होती. चतुरंग प्रतिष्ठानतर्फे त्याचे केळवण करण्यात आले होते. हे त्याचे पहिलेच केळवण होते. त्याच्या केळवणाला सुरूवात झाली असल्याचे त्यानं यावरून घोषित केले होते. सध्या त्या दोघांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. त्यांच्याबद्दलही चांगलीच चर्चा रंगली आहे. ते नक्की एकमेकांच्या प्रेमात कसे पडले? एकमेकांना प्रपोज कधी केलं? आता लग्न कधी करणार? अशा नानाप्रश्नांचा तिच्यावर भडिमार सुरू झाला आहे. त्यात त्यांच्या एकामागून एक पोस्टही व्हायरल होताना दिसत आहेत. आता प्रथमेशच्या एका पोस्टनं सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी त्यानं होणाऱ्या सासूबाईंना म्हणजेच मुग्धाच्या आईला खास वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ज्यात त्यानं त्यांना खास नावानं हाक मारली आहे. तुम्हाला याबद्दल नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. यावेळी मुग्धाच्या आईसोबतचा एख खूपच गोड फोटो प्रथमेशनं शेअर केला आहे. यावेळी लघाटे आणि वैशंपायन कुटुंबियांनी एकत्र येत मुग्धाच्या आईचा वाढदिवस सेलिब्रेटी केला. त्यांच्या या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो मुग्धा आणि प्रथमेश दोघांनी त्यांच्या इन्टाग्राम अकांऊटवरून शेअर केले आहेत. मुग्धाची आई भाग्यश्री वैशंपायन यांचा काल वाढदिवस होता.


यानिमित्तानं त्यानं मुग्धाच्या आईसोबतचा त्यांचा एक गोड फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात त्यानं मुग्धाच्या आईच्या खांद्यावर हात ठेवला आहे. सध्या त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यावेळी त्यानं 'वाढदिवसाच्या शुभेच्छा मावशी' असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. 


हेही वाचा - लक्झरीयस गाड्यांनंतर आता कार्तिक आर्यनच्या खिशात पडलं नवं घर! किंमत पाहा


2008 आलेल्या सारेगमप लिटिल चॅम्प्स या गायन स्पर्धेच्या शोमधून मुग्धा वैशंपायन, आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, रोहित राऊत आणि प्रथमेश लघाटे या पाच तारे प्रेक्षकांना मिळाले. तेव्हा या लिटिल चॅम्प्सची चांगलीच क्रेझ होती. त्यांच्या गाण्यांचे सर्वच जण त्यावेळी फॅन्स होते आजही आहेत.



प्रथमेश लघाटे मुग्धा वैशंपायनच्या आईसोबत (फोटो सौजन्य: प्रथमेश लघाटे इन्टाग्राम)


काही महिन्यांपुर्वी आलेल्या सारेगमप लिटिल चॅम्प्समधून या पाचही जणांनी नव्या आणि उमद्या लहानग्या गायकांचे परीक्षण केले होते त्यामुळे त्यांना ट्रोलही करण्यात आले होते. परंतु हाही शो तेव्हा तूफान गाजला होता आणि या शोला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसादही मिळाला होता. या शोचे सुत्रसंचालन अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिनं केले होते. आता मुग्धा आणि प्रथमेशच्या लग्नाच्या चर्चांनी इंटनेटवर पुरता घुमाकूळ घातला आहे.