Pravin Tarde In SS Rajamauli Upcoming Movies: लोकप्रिय मराठमोळे दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे (Pravin Tarde) हे त्यांच्या अभिनयासाठी चांगलेच चर्चेत असतात. ते नुकतेच आणीबाणी या चित्रपटात झळकले. या चित्रपटातील त्यांची एक वेगळीच भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळाली. दरम्यान, प्रवीण तरडे हे नेहमीच बेधकडपणे त्यांचे मत मांडताना दिसतात. त्यांच्या अभिनयाचे तर सगळे वेड आहेत. त्यांचा आवडता दिग्दर्शक दुसरं तिसरं कोणी नसून दाक्षिणात्य लोकप्रिय दिग्दर्शक एस. एस. राजामौली आहेत. जे प्रवीण तरडे यांचे आदर्श आहेत, ज्यांचा फोटो प्रवीण तरडे यांनी घरात लावला आहे. त्यांच्या सोबत काम करण्याची संधी प्रवीण तरडे यांना मिळाली आहे. प्रवीण तरडे लवकरच एस. एस. राजामौली यांच्यासोबत काम करताना दिसणार आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रवीण तरडे यांनी हा खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रवीण तरडे आणि उपेंद्र लिमये (Upendra Limaye) यांनी नुकतीच बोल भिडूला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत प्रवीण तरडे यांनी मुलाखतीत प्रवीण तरडे यांनी दाक्षिणात्य चित्रपटात काम करणार असल्याचा खुलासा केला आहे. दाक्षिणात्य चित्रपटात फक्त ते पदापर्ण करणार नाही आहेत, तर आवडत्या दिग्दर्शकाच्या चित्रपटातून त्यांना ही संधी मिळाली आहे. याविषयी सांगत प्रवीण तरडे म्हणाले की ते एका खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. प्रवीण तरडे म्हणाले, 'राजामौली सर हे माझे आदर्श आहेत. बाहुबलीच्या आधीपासून जवळपास १३ वर्षांपासून माझ्या ऑफिसमध्ये त्यांचा फोटो आहे.  ते एकमेव व्यक्ती आहेत जे त्यांची भाषा, राज्य आणि प्रादेशिकतेला पुढे घेऊन जात आहेत. त्यांच्या आजूबाजूच्या समाजाची गोष्ट ते सांगतात.'



हेही वाचा : स्मृती इराणी यांच्याविषयी 'या' खास गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?


याविषयी पुढे सांगत प्रवीण तरडे म्हणाले की 'धर्मवीरच्या प्रमोशनच्या निमित्तानं त्यांना भेटण्याचा योग्य आला होता. त्यावेळी त्यांना भेटून मी खूप भारावलो. त्यावेळी माझ्या घरात तुमचा फोटो आहे हे मी त्यांना सांगितलं. जेव्हा राजामौली सरांनी पहिल्यांदा मला पाहिलं तेव्हा ते मला म्हणाले तुमचा लूक तेलगू चित्रपटांना साजेसा आहे. त्यानंतर आता त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळते. खरंतर 20 ते 22 वर्षे फक्त त्यांना भेटण्याचं स्वप्न पाहत असलेला मी आज राजामौली यांच्यासोबत काम करतोय. या गोष्टीचा मला खूप जास्त आनंद आहे. मी त्यांच्या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. लवकरच ते पत्रकार परिषद घेत या चित्रपटाविषयी अधिकृत घोषणा करणार आहेत.'