Kareena Kapoor ने येणाऱ्या बाळासाठी काय म्हटलंय?
शेअर केली अतिशय भावनिक पोस्ट
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) सोशल मीडियावर खूप ऍक्टीव असते. नुकताच करीनाने एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये मोनोक्रोम फोटो शेअर करत मनातील एक भावना शेअर केली आहे. ती भावना इतकी सुंदर आहे ज्यामुळे पुन्हा एकदा करीनाचं वेगळेपणं दिसून आलं आहे.
करीना कपूर खान आपल्या दुसऱ्या बाळाची खूप आतुरतेने वाट पाहत आहे. हे तीने एका पोस्टमधून सांगितलं आहे. इंस्टाग्रामवर करीनाने एक मोनोक्रोम फोटो शेअर करत सोफ्यावर बसलेली दिसत आहे.
करीनाने लिहिली ही कॅप्शन
करीना कपूर खानने सोशल मीडियावर पोस्ट केलेला फोटो वेटिंग मोडचा आहे. करीना आपल्या दुसऱ्या बाळाची अतिशय आतुरतेने वाट पाहत आहे. सोफ्यावर बसलेली करीना आपल्या बाळाची वाट पाहत आहे. करीना या फोटोसोबत लिहिते की,'मी वाट पाहत आहे.' या कॅप्शनवरून असंच दिसतंय आता करीना खूप वाट पाहत आहे.
करीना कपूर खानच्या अतिशय दोन जवळच्या मैत्रिणी आहेत. एक अभिनेत्री मलाइका अरोरा आणि अमृता अरोरा. या दोघींनीही या पोस्टवर कमेंट केले होते. अभिनेत्री मलाइकाने म्हटलंय की,'मी पण करत आहे.' तर अमृताने म्हटलंय की,'मी देखील वाट पाहत आहे.'