Preity Zinta corona test: प्रीति झिंटा म्हणते मी कोव्हिड क्वीन
अभिनेत्री प्रीति झिंटाने २० वेळेस कोविड टेस्ट केली आहे. या दरम्यान प्रीति झिंटाने म्हटलं आहे.
दुबई : अभिनेत्री प्रीति झिंटाने २० वेळेस कोविड टेस्ट केली आहे. या दरम्यान प्रीति झिंटाने म्हटलं आहे की, ती कोव्हिड क्वीन बनली आहे. ही गोष्ट प्रीति झिंटाने सांगताना म्हटलं आहे की, ती कोव्हिड क्वीन झाली आहे. हे प्रीति झिंटाने गंमतीत म्हटलं आहे. प्रीति झिंटा सध्या आयपीएलसाठी यूएईमध्ये आहे.
प्रीति झिंटा आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी यूएईत पोहोचली आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबला प्रीति झिंटा सपोर्ट करते. कोरोना टेस्ट करताना त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यात ती फॅन्सना काहीतरी सांगतेय.
व्हिडीओसोबत ती लिहिते, माझी विसव्यांदा कोरोना टेस्ट झाली आहे, मी आता कोव्हिड क्वीन बनली आहे. एवढंच नाही प्रीति झिंटाने व्हि़डीओत Bio Bubble मध्ये राहण्याचा अनुभव शेअर केला आहे. प्रीति झिंटा म्हणते की, ती बायो बबलमध्ये राहते, या दरम्यान तिची लाईफ कशी सुरु आहे, हे तिने लिहिलं आहे.
प्रीति म्हणते, मला प्रत्येक जण विचारतो, आयपीएल टीम बायो बबलमध्ये राहणं कसं असतं. प्रीति म्हणते बायो बबलमध्ये राहणं पहिल्या ६ दिवसाच्या क्वारंटाईनपासून सुरु होतं. यात प्रत्येक ३ ते ४ दिवसात कोव्हिड टेस्ट होते. तुम्ही कुठेही बाहेर नाही जावू शकत. फक्त खोलीतच जावू शकतात. तुमचे ड्रायव्हर्स, शेफ हे सर्व बायो बबलमध्येच राहतात.
बाहेरच्या लोकांशी तुम्ही बोलू शकत नाही. तुम्ही माझ्यासारखे फ्री बर्ड असाल तर आणखी कठीण आहे. फक्त आनंद हाच आहे की, या साथीच्या काळात आयपीएल तेवढं खेळवलं जात आहे.
प्रीतिने ही माहिती इन्टाग्रामवर दिली आहे, त्याचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे, एक पीपीई किट घातलेली मेडिकल स्टाफची महिला तिची टेस्ट करताना दिसत आहे, प्रीति म्हणते, ही महिला कोरोना टेस्ट करण्यासाठी योग्य व्यक्ती आहे, ती अतिशय साधेपणाने ही तपासणी करते.