मुंबई : अभिनेत्री प्रिती झिंटा (Preity Zinta) आणि पती जीन गुडइनफ (Gene Goodenough) यांनी गुरूवारी सोशल मीडियावर एक आनंदाची बातमी दिली आहे. या जोडप्याने सरोगेसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांना जन्म दिला. ही आनंदाची बातमी खुद्द प्रितीने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. सोबतचं तिने तिच्या जुळ्या मुलांची नावे देखील घोषित केली आहेत. प्रितीच्या आयुष्यात आनंदाचा क्षण आल्यामुळे सोशल मीडियावर अनेक कलाकार आणि चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रिती ट्विट करत म्हणाली, 'सर्वांना माझा नमस्कार... तुम्हा सर्वांसोबत एक आनंदाची बातमी शेअर करायची आहे. जीन आणि मी खूप आनंदी आहोत. यावेळी आमची अंतःकरणे कृतज्ञता आणि प्रेमाने भरलेली आहेत.' 


पुढे प्रिती म्हणाली, 'आम्ही आमच्या जुळ्या मुलांचे जय झिंटा गुडइनफ आणि जिया झिंटा गुडइनफ नाव ठेवलं आहे आणि आमच्या कुटुंबात आम्ही त्यांचं स्वागत करतो.' पोस्ट शेअर करत प्रितीने पतीसोबत एक सुंदर फोटो शेअर केला आहे.