मुंबई : अभिनेत्री श्रीदेवीचा दुबईत अकाली मृत्यू झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वयाच्या 54 व्या वर्षी श्रीदेवीचे निधन टबबाथमध्ये बुडून झाले. श्रीदेवीच्या  अकाली निधनामुळे त्यांचे चाहते सोबतच अवघे बॉलिवूडही हळहळले आहे. 


बॉलिवूडने दिला श्रीदेवीला अखेरचा निरोप  


अभिनेत्री श्रीदेवीचे निधन शनिवारी ( 24 फेब्रुवारी) रोजी रात्री दुबईत झाले. मृत्यूनंतर 72 तासाने श्रीदेवींचे पार्थिव प्रायव्हेट जेटने मुंबईत आणण्यात आले. दरम्यान श्रीदेवींच्या मुली भारतात अनिल कपूर यांच्याकडे होत्या. जान्हवी आणि खुशी कपूरचे सांत्वन करण्यासाठी आणि श्रीदेवींचे अंतिम दर्शन घेण्यासाठी अवघे बॉलिवूड लोटले होते. अनेक साऊथ इंडियन स्टार्सदेखील मुंबईत पोहचले होते. मात्र अभिनेत्री प्रिती झिंटाला श्रीदेवींचे अंतिम दर्शन घेता आले नाही.  


का नाही घेतलं प्रितीनं अंतिम दर्शन 


अभिनेत्री श्रीदेवीच्या अंतिम दर्शनाला प्रिती झिंटा पोहचू शकली नाही. याबाबतची खंत प्रितीने इंस्टाग्रामवर बोलून दाखवली आहे. प्रिती सध्या परदेशामध्ये असल्याने ती श्रीदेवींचे अंतिम दर्शन घेऊ शकली नाही. मात्र श्रीदेवींबाबतच्या तिच्या मनातील भावना एका खास पोस्टच्या माध्यमातून लिहल्या आहेत.   


काय म्हणाली प्रीती ? 



 


श्रीदेवी कायमच 'हवाहवाई' राहणार आहे. माझ्यासाठी प्रेरणास्थान आणि आदर्शवादी असलेल्या श्रीदेवीला मुक्ती आणि शांती मिळो अशा शब्दात तिने आदरांजली वाहिली आहे.