मुंबई:प्रेम म्हणजे काय असतं, 'प्रेम' ही संकल्पना एका वाक्यात कधिही उलगडता येत नाही.प्रेम ही एका भावना आहे. 'प्रेम' या लहानशा शब्दामध्ये अनेक चांगल्या वाईट आठवणी दडलेल्या असतात. प्रेमाला कोणत्याही प्रकार चे बंधण नसते.प्रेमाला कोणत्याही चौकटीमध्ये अडकवता येत नाही.प्रेमाची अनेक रुपे आहेत. कॉलेज मध्ये पहिल्यांदाच पाय ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेम ही भावना अतिशय वेगळी असते. कॉलेज मध्ये झालेलं पहिलं प्रेम कधिच विसरता येत नाही. मनाच्या एका कोपऱ्या मध्ये ते आयुष्यभर दडलेलं असतं, कॉलेज जिवनातील प्रेमाची सफर घडवणारा  'प्रेमवारी' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटण्यासाठी येणार आहे. सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे हा ट्रेलर पाहून नेमकं प्रेम म्हणजे काय असतं हे दाखविण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


 


'प्रेमवारी' सिनेमात राहुल आणि पूजा यांच्या प्रेमाची कहानी कॉलेज प्रेमींना अनुभवायला मिळणार आहे. कॉलेजमधील तरुणाईमध्ये अंकुरणारं प्रेम हे काही निराळचं असतं. प्रेमवारी सिनेमातील प्रेमी युगुलांच्या प्रेमात येणाऱ्या अडचणी, घरच्यांचा विरोध,त्यावर दोघांनी केलेली मात या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहेत. साईममित प्रोडक्शन निर्मित ‘प्रेमवारी’‘व्हॅलेंटाइन डे च्या आठवड्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. येत्या ८ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.चिन्मय उदगीरकर आणि मयुरी कापडणे मुख्य भूमिकेत बजावताना दिसणार आहेत. माध्यमातून मयुरी कापडणेने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.