मुंबई : अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर कलाविश्वाला आणि त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ह्रदय विकाराच्या झटक्याने अवघ्या 40व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. सिद्धार्थच्या पार्थिवावर आज ब्रह्मकुमारी पद्धतीने अंत्यविधी होणार आहेत. थोड्याच वेळात मृतदेह रुग्णवाहिकेतून ओशिवरा येथील सिद्धार्थच्या घरी नेण्यात येईल. अंत्यसंस्कारासाठी रुग्णवाहिका फुलांनी सजवली आहे.  पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर यानंतर आता त्याचे पार्थिव घराच्या दिशेने रवाना करण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने 'बिग बॉस 13' सिझन आपल्या नावावर केलं. त्यानंतर 'खतरो के खिलाडी'मध्ये देखील त्याने विजय मिळवला. फक्त रियालिटी शो नाही तर सिद्धार्थने अनेक मालिकांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारली. 'बालिका वधू' मालिकेच्या माध्यमातून तो घरा-घरात पोहोचला आणि प्रेक्षकांच्या मनात त्याने घर केलं. 



चाहत्यांच्या मनात राज्य करणाऱ्या सिद्धार्थने अखेर जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे. एका मॉडेलच्या रूपात त्याने करियरला सुरूवात केली. त्यानंतर 2004 साली त्याने अभिनयात पदार्पण केलं. 2008 रोजी त्याने 'बाबुल का आंगन छूटे' या मालिकेत दिसला. पण सिद्धार्थला लोकप्रियता 'बालिका वधू' मालिकेच्या माध्यमातून मिळाली.