मुंबई : प्रियंका चोप्रा आणि इंटरनॅशनल पॉप स्टार निक जोनसच्या साखरपुड्याची बातमी दिवसेंदिवस जोर धरत आहे. सोशल मीडियावर याची खूप चर्चा आहे. अशी चर्चा आहे की, प्रियंका चोप्राच्या 36 व्या वाढदिवसादिवशी सुंदर अंगठी देऊन निकने लग्नासाठी मागणी घातली आहे. आता अशी बातमी आली आहे की, प्रियंका - निकचा साखरपुडा तिच्या मुंबईच्या घरी असणार आहे. या कार्यक्रमासाठी निक आणि त्याचा परिवार मुंबईत पोहोचला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोटो जर्नलिस्ट योगेश शाहने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये प्रियंका चोप्राच घर सजवताना दिसत आहे. तसेच प्रियंका चोप्राच्या घरी एका पंडितला देखील पाहण्यात आलं आहे. त्यामुळे हे स्पष्ट झालं आहे की, प्रियंका - निक यांचा साखरपुडा अगदी हिंदू पारंपरिक पद्धतीने होणार आहे. 




तसेच निक आपल्या आई - वडिलांसोबत एअरपोर्टवर दिसला आहे. प्रियंका देखील निकच्या कुटुंबियांना घेण्यासाठी एअरपोर्टवर पोहोचली होती. एअरपोर्टवर त्यांच विमान लवकर पोहोचले होते पण प्रियंका आल्याशिवाय ते बाहेर आले नाहीत