मुंबई : प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'बिग बॉस ९' फेम विजेता प्रिन्स नरुलाच्या भावाचं निधन झाल्याचं दुर्दैवी घटना घटली आहे. प्रिन्सचा चुलत भाऊ रुपेश नरुला याचं सोमवारी कॅनडामध्ये नदीत वाहून गेल्याने अपघाती निधन झालं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'टेली चक्कर'ने दिलेल्या वृत्तानुसार, रुपेश नरुला कॅनडातील टोरंटोस्थित Scarborough ब्लर्फ्स पार्क बीच येथे 'कॅनडा डे' साजरा करण्यासाठी गेला होता. यावेळी नदीच्या प्रवाहात तो वाहून गेला. रुपेशला पोहता येत नव्हतं, त्यामुळे पाण्याच्या प्रवाहात बुडून त्याचं निधन झाल्याची माहिती मिळत आहे.


गेल्या तीन महिन्यांपूर्वीच रुपेशचं लग्न झालं होतं. या घटनेनंतर प्रिन्स आणि पत्नी युविका दोघेही रुपेशच्या अंतिम संस्कारासाठी कॅनडाला रवाना झाले आहेत. 



प्रिन्स नरुला टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध चेहरा आहे. रोडीज एक्स २, स्प्लीट्सविला ८, बिग बॉस ९ या रिअॅलिटी शोचा तो विजेता आहे. सध्या प्रिन्स 'रोडीज रियल हिरोज' या रिअॅलिटी शोमध्ये गॅंग लिडर आहे. प्रिन्स आणि युविका आगामी 'नच बलिये' सीजनमध्ये सहभागी होणार असल्याचं बोललं जात आहे. 


प्रिन्स आणि युविका यांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली.