मुंबई : कितीही श्रीमंती, कितीही यश आणि कितीही प्रसिद्धी आपल्या वाट्याला आलेली असली तरीही काही मंडळी मात्र कायम सर्वसामान्य आयुष्य जगण्याला महत्त्वं देताना दिसतात. समाजात असणारी प्रतिष्ठा , सन्मानाचा मान राखत ही मंडळी त्यांच्या जगण्यातून नकळतच काही आदर्श प्रस्थापित करत असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशाच काही व्यक्तींपैकी एक म्हणजे अभिनेत्री मोहिना कुमारी (Mohena Kumari). 


एका शाही कुटुंबाशी नातं असणाऱ्या मोहिनाने डान्स रिअॅलिटी शोमधून कला जगतामध्ये पाऊल ठेवलं. 


पाहता पाहता ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आणि मालिका विश्वाची दारं तिच्यासाठी खुली झाली.


' ये रिश्ता क्या कहलाता है...' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) या मालिकेतून झळकलेल्या मोहिनाने सध्या मात्र कला जगतापासून दुरावा पत्करला आहे. 


एका राजघराण्याशी नातं असणारा हा चेहरा जेव्हा प्रेक्षकांच्या समोर आला, तेव्हा तिच्या कुटुंबाचा राजेशाही थाट पाहून सर्वच थक्क झाले. 


मोहिना ही रिवाचे राजा पुष्पराज सिंह जूदेव यांची कन्या. सतपाल महाराजांचा धाकटा मुलगा, सुयश रावत सिंह यांच्याशी तिनं लग्नगाठ बांधली. 


उत्तराखंडमध्ये मोठ्या थाटामाटात आणि शाही पद्धतीनं हा विवाहसोहळा पार पडला होता. 




आता म्हणे याच राजकुमारीच्या पोटी आनंद वार्तेची चाहुल लागली आहे. मोहिना गरोदर असून, बाळाच्या स्वागतासाठी ही शाही जोडी आता सज्ज होताना दिसत आहे. 


सोशल मीडियाच्या माध्यमातून तिनं ही गोड बातमी सर्वांच्या भेटीला आणली. जिथं ती आणि तिचा पती या दोघांच्याही चेहऱ्यावर असणाऱा आनंद स्पष्टपणे दिसत आहे.