मुंबई :  बॉलिवूडच्या आवडत्या कपलपैकी एक म्हणजे अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केलं.   प्रत्येक गोष्टीत दीपिका आणि रणवीर  एकमेकांना सहकार्य आणि पाठिंबा देतात. नुकताचं रणवीर न्यूड फोटोशूट प्रकरण वादाच्या भोवऱ्यात अडकला. तेव्हा दीपिकाने पतीची साथ दिली. एवढंच नाही तर, दोघेही एकमेकांसोबत सोशल मीडियावर फोटो शेअर करत प्रेम व्यक्त करताना दिसतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता देखील दीपिकाने त्यांचे काही रोमांटिक क्षण इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये रणवीर आणि दीपिका एकत्र प्रचंड सुंदर दिसत आहेत. फोटो शेअक करत दीपिकाने कॅप्शनमध्ये 'And it went like…' असं लिहिलं आहे. सध्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 



दरम्यान, दीपिकाने नुकताच एका फॅशन शोमध्ये रणवीर सिंगसोबत वॉक करताना दिसली. दोघांचे कपडे मनीष मल्होत्राने डिझाइन केले होते. याच फॅशन शो दरम्यानचे काही फोटो दीपिकाने काही फोटो शेअर केले आहेत. 


या फोटोंमध्ये चाहत्यांना दीपिका आणि रणवीरमधील केमिस्ट्री पाहायला मिळाली. दीपिकाच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट केली आहेत. 'किसिकी नजर ना लगे...' अशी कमेंट दीपवीरच्या एका चाहत्यांने केली आहे. तर अनेकांनी 'उत्तम जोडी..' अशी कमेंट केली आहे. 


दीपिका पदुकोणच्या फोटोंना इंस्टाग्रामवर जवळपास नऊ लाख लाइक्स मिळाले आहेत. तर फोटोंवर तीन हजारांच्या आसपास कमेंट करण्यात आल्या आहेत. चाहत्यांमध्ये दोघांबद्दल प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे.