Priya Bapat School Photo: प्रिया बापट ही आपल्या हटके अभिनयासाठी ओळखली जाते. सध्या तिच्या 'सिटी ऑफ ड्रीम्स' ही वेबमालिका सध्या फार गाजते आहे. त्यामुळे या मालिकेची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या वेबसिरिजचा तिसरा भाग सध्या प्रदर्शित झाला आहे. या वेबसिरिजला तूफान प्रतिसाद आल्याचा दिसतो आहे. ही वेबमालिकाही सध्या जोरात व्हायरल होते आहे. प्रिया ही लहानपणापासून चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. तिच्या अभिनयानं तिनं लहानपणापासूनच चाहत्यांना वेड लावलं आहे. त्यानंतर तिनं अनेक मराठी मालिकांमधूनही कामं केली आहेत. 2000 साली आलेली एक मराठी मालिका तुम्हाला चांगलीच माहिती असेल. तिचं नावं म्हणजे 'झी मराठी'वरील 'दे धमाल' ही मालिका. ही मालिका तेव्हा प्रचंड गाजली होती. आज याच मालिकेतील एक आठवण प्रियानं शेअर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याच मालिकेच्या वेळेस प्रिया 14-15 वर्षांची असावी कारण तिचा जन्म 1986 सालतला आहे. त्यामुळे शाळेत जाणारी अगदी बबली मुलगी अशी ती या मालिकेतून दिसते आहे. त्यामुळे सध्या या मालिकेतील ती त्यावेळची छबी नेटकऱ्यांना पाहायला मिळते आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांच्या तूफान कमेंट्स येताना दिसत आहेत. तुमच्या लहानपणी तुम्ही ही मालिका नक्कीच पाहिली असेल. या मालिकेतून शाळेत जाणाऱ्या लहान मुलांच्या मैत्रीची कथा समोर आली होती जे एकाच सोसायटीमध्ये राहत होते. या मालिकेत अनेक ज्येष्ठ अभिनेते आणि अभिनेत्रीही होत्या. त्यामुळे मराठी प्रेक्षकांसाठी ही एक चांगलीच पर्वणी होती. या मालिकेली त्यावेळी प्रचंड प्रमाणात प्रेक्षकांची दाद देली होती. 


हेही वाचा - खरं प्रेम ते हेच, नाही सोडली साथ! आधी बालपणीचे मित्र आता जन्माचे प्रेमी...


यावेळी तिनं ही पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, ''तुम्हाला आठवते का ही सिरियल? मला शोधू शकता का तुम्ही?'' असं तिनं यावेळी म्हटलं आहे. तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी तूफान कमेंट्सचा पाऊसचा पाडला आहे. एकानं म्हटलंय की, ''ही आमची पहिली क्रश आहे जे 86-87 मध्ये जन्माला आले आहेत'' तर दुसऱ्या एकानं लिहिलंय की, ''प्रिया तुला जो कोणी माणूस या फोटोतून ओळखू शकणार नाही, तो मराठी माणूस नाही''. तर अनेकांनी त्यावर ही मालिका परत सुरू करा अशी कमेंट केली आहे. अनेकांनी ही मालिका कोणती आहे हेही ओळखलं आहे, सर्वांनीच यावर 'दे धमाल' असं म्हटलं आहे.



प्रियाच्या फॅन फॉलोईंगमध्ये वाढ होताना दिसते आहे. आता तिच्या या फोटोमुळे नेटकऱ्यांना त्यांच्या जुन्या आणि लहानपणीच्या आठवणी आठवल्या आहेत. त्यामुळे तिचा हा जुना फोटो पाहुन सर्वांनाच आनंद झाल आहे. प्रिया या फोटोच्या डाव्या बाजूला दिसते आहे. ज्यात ती शाळेचा ड्रेस घालून आहे.