नवी दिल्ली :  अवघ्या १८ वर्षांच्या प्रिया प्रकाश या  मल्याळम अभिनेत्रीच्या डोळ्याच्या अभिनयाचे आज लाखो चाहते आहे.  ओमर लुलू यांच्या 'ओरु अदार लव्ह' या मल्ल्याळम सिनेमातून प्रिया पदार्पण करत आहे. 'मणिक्या मलराया पूवी' हे गाणं रिलीज करण्यात आलं. व्हायरल झालेली क्लीप याच गाण्यातील आहे. ती लवकरच मल्याळम चित्रपट उरू अदार लवच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. प्रियाचा पहिला चित्रपट या वर्षी ईदला येणार आहे. मात्र हा सिनेमा रिलीज होण्याआधीच प्रिया लोकप्रिय झाली आहे. प्रिया प्रकाशच्या व्हिडीओचे लोक एवढे चाहते आहेत की, नवीन व्हिडीओ इंटरनेटवर आला की तो लगेच व्हायरल होतो. त्यात आणखी एका व्हिडिओची भर पडली आहे. या व्हिडिओत तिने डोळ्यांचा अभिनय केला नाहीए पण ज्यापद्धतीने इशारे करत स्माइल दिलीय त्याचे लाखो झाले चाहते आहेत. आतापर्यंत हा व्हिडिओ ७.५ लाखाहून अधिकजणांनी पाहिलाय. यासोबतच लाखो कमेंट्सही येत आहेत.



५० लाखपेक्षा अधिक फॉलोअर्स


मीडिया रिपोर्ट्सनुसार प्रियाने आपल्या व्हिडिओ इंस्टाग्रामच्या माध्यमातून सर्वात जास्त कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींनी मागे टाकलं आहे. प्रिया प्रकाशचे अनेक व्हिडियो वायरल झाल्यानंतर इंस्टाग्राम फॉलोअर्सची संख्या ५० लाखांपेक्षा जास्त झाली आहे. यानंतर प्रिया प्रकाशने आपल्या इन्स्ट्राग्रामवर अनेक बड्या ब्रॅण्डची जाहिरात केली आहे.